Friday, August 21, 2026
spot_img
spot_img

तमिळनाडू मुख्यमंत्र्यांचं आमदारांसाठी मोठं गिफ्ट; नवीन वाहनासह दरमहा 1 लाख रुपयांचा भत्ता

एक नजर महाराष्ट्र न्युज                  तमिळनाडूतील सर्व आमदारांसाठी मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांनी बुधवारी विधानसभेत मोठ्या सवलतींची घोषणा केली.                                     वृत्तसंस्था, चेन्नई: तमिळनाडूतील सर्व आमदारांसाठी मुख्यमंत्री विजय यांनी बुधवारी विधानसभेत मोठ्या सवलतींची घोषणा केली. मतदारसंघातील जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी व विकासकामांची पाहणी करण्यासाठी सर्व २३४ आमदारांना शासकीय वाहन आणि दरमहा एक लाख रुपयांचा भत्ता दिला जाईल, असे त्यांनी जाहीर केले.                                                     या भत्त्यामध्ये वाहनाचे इंधन, चालक व देखभालीसाठी दरमहा ७५,००० रुपये आणि वैयक्तिक सहाय्यकासाठी २५,००० रुपयांचा समावेश असेल. प्रामाणिक, पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त प्रशासनासाठी आमदारांचे आर्थिक परावलंबित्व कमी करणे हा यामागचा उद्देश असल्याचे विजय यांनी स्पष्ट केले. आमदार एल. ई. जोथिमाणी यांच्या मागणीचा संदर्भ देत त्यांनी यासंबंधी कायद्यात योग्य सुधारणा करण्याचे जाहीर केले.                                                     या घोषणेनंतर टीव्हीके पक्षाच्या गुडीयाथम मतदारसंघातील आमदार के. सिंधू यांनी सभागृहातच आनंदाच्या भरात गाणे गाऊन मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. त्यांनी १९६४ मधील ‘पडगोट्टी’ चित्रपटातील दिवंगत नेते एम. जी. रामचंद्रन (एमजीआर) यांच्यावरील टी. एम. सौंदर्यराजन यांनी गायलेले व वाली यांनी लिहिलेले ‘कोडुथथेलम कोडुथान’ हे प्रसिद्ध गाणे सादर केले. दरम्यान राज्य सरकारतर्फे पेपरफुटी रोखण्यासंदर्भात कायदा करण्याचा प्रस्ताव विचाराधीन होता, मात्र हा निर्णय रद्द करण्यात आला आहे.                                                      रोज पहा. एक नजर महाराष्ट्र न्युज

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या