एक नजर महाराष्ट्र न्युज
संपादक भिमसेन जाधव
नागपूर : अभिनेते सयाजी शिंदे यांनी नागपुरातून ‘सेव्ह सह्याद्री’ चळवळ सुरू केली. विकासाच्या नावाखाली वृक्षतोड होत असल्याचा आरोप करत त्यांनी सह्याद्री आणि गडकिल्ल्यांच्या संरक्षणासाठी नागरिकांना आवाहन केले.
मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे हे नेहमीच निसर्गाचं संर्वधन आणि त्यावरील उपाययोजना करताना पहायला मिळतात. दरम्यान अशातच त्यांनी ‘सह्याद्रीचे जंगले, नद्या, डोंगर ही महाराष्ट्राची संपत्ती विकासाच्या नावाखाली नष्ट केली जात’ असल्याचा आरोप केलाय. तसंच ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी जोडलेल्या गडकिल्ल्यांच्या अस्तित्वालाही धोका असल्याची’ चिंता त्यांनी व्यक्त केलीय. तसंच या पार्श्वभूमीवर त्यांनी ‘सेव्ह सह्याद्री’ ही चळवळ सुरु केलीय.
या चळवळीमध्ये सह्याद्रीच संरक्षण तसंच झाडांचं संवर्धन आणि पर्यावरणाच्या सुरक्षेसाठी नागरिकांनी एकत्र येण्याचा आवाहन करण्यात आलं आहे. या उपक्रमातून सह्याद्रीच्या रक्षणाचा संदेश देशभर पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. ‘विकासाच्या नावाखाली महाराष्ट्राची फसवणूक केली जात आहे. झाडांसकट महाराष्ट्र विकायला काढला जात आहे’ असं म्हणत सयाजी शिंदेंनी या प्रकल्पाबाबत नाराजीही व्यक्त केलीय. तसंच झाडे नष्ट करणाऱ्या प्रवृत्तीला त्यांनी झाडखाऊ व्हायरस अशी उपमा देत ‘हा व्हाययस पळवून लावण्यासाठी सगळ्या नागरिकांनी एकत्र येण्याची गरज असल्याचं’ म्हटलय.
पुढे बोलताना ते म्हणाले की, ‘सह्याद्री हा आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा, स्वाभिमानाचा आणि स्वराज्याचा साक्षीदार आहे. त्यामुळे हे गडकिल्ले, जंगल ही महाराष्ट्राची अस्मिता आहे. आपल्या सगळ्यांना महाराजांचा वारसा जपायचा आहे. त्यामुळे सह्याद्रीचं संरक्षण करणं आवश्यक आहे. त्यामुळे नागरिकांनी एकत्र येत वृक्षांच्या संरक्षणासाठी पुढाकार घ्यावा, तसंच वृक्षतोडीचा सरकारला हिशेब विचारावा’ असं आवाहन सयाजी शिंदे यांनी केलय.
रोज पहा एक नजर महाराष्ट्र न्युज







Total Users : 256567