बारामती येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात देहदान करणाऱ्या कुटुंबीयांच्या सन्मान सोहळ्यात त्या बोलत होत्या.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अपर पोलीस अधीक्षक श्री. गणेश बिरादार उपस्थित होते.
यावेळी श्री.बिरादार यांनी देहदान व अवयवदानाचे सामाजिक महत्त्व स्पष्ट करत समाजात व्यापक जनजागृती करुन अधिकाधिक नागरिकांनी या महान कार्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले.
डॉ. गीतांजली सुडके यांनी देहदानातून वैद्यकीय शिक्षण, संशोधन तसेच देहदानाची आजच्या काळाची गरज या विषयी सविस्तर विश्लेषण केले, तर डॉ. सुरज जाधवर यांनी अवयवदानातून गरजू रुग्णांना मिळणाऱ्या जीवनदानाचे महत्त्व अधोरेखित केले. यावेळी देहदान करणाऱ्या दात्यांच्या नातेवाईकांचा स्मृतीचिन्ह देऊन विशेष सन्मान करून त्यांच्या महान मानवतावादी निर्णयाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
कार्यक्रमादरम्यान देहदान व अवयवदानाबाबत समाजात असलेल्या गैरसमज व शंकांचे निरसन दूर करून वैज्ञानिक दृष्टिकोनातून जनजागृती करण्यात आली. कार्यक्रमाला उपअधिष्ठाता डॉ. सचिन दगडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेश उमाप तसेच प्राध्यापक व विभागप्रमुख डॉ. विवेक सहस्त्रबुध्ये, डॉ. लीना नकाते, डॉ. राजेश हिरे, डॉ. विनय टापरे, डॉ. किरण जाधव, डॉ. सुजाता धर्मशाळे आणि विद्यार्थी, देहदात्यांचे नातेवाईक, पत्रकार, कर्मचारी व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थितांचे श्री. किरण घुगे यांनी आभार मानले.







Total Users : 254186