बारामती : एक नजर महाराष्ट्र न्यूज राज्य परिवहन महामंडळाचा 78 वा वर्धापन दिन बारामती आगारामध्ये मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला .यावेळी बारामतीचे माजी आगार प्रमुख रविराज घोगरे ,जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे अशासकीय सदस्य प्रमोद जाधव, आगार व्यवस्थापक प्रवीण शिंदे, वाहतूक अधीक्षक अपर्णा पवार, वर्कशॉप प्रमुख सुरेश कदम, वाहतूक अधीक्षक विशाल सावंत, निवृत्त स्थानक प्रमुख घनश्याम शिंदे ,यांच्या हस्ते लाल परिचे पूजन करण्यात आले व उपस्थित प्रवाशांना गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी संघटनेचे प्रमुख सलीम शेख, विकास सावंत ,लतीफ अत्तार ,शाहिद सय्यद ,यांसह कर्मचारी रुंद, प्रवासी ,वाहक, चालक ,मोठ्या संख्येने उपस्थित होते. राज्य परिवहन मंडळाच्या लाल परीने 1 जून 1948 रोजी पुणे येथून सर्वप्रथम प्रवास केला. यामुळे जून 2026 रोजी यास 78 वर्षे पूर्ण होत आहे. आणि दुग्ध शर्करा योग म्हणजे बारामती आगारास यावर्षीचे शासना चे एक कोटीचे बक्षीस जाहीर झालेले आहे. त्यामुळे या कार्यक्रमास वेगळे महत्त्व प्राप्त झालेले होते .अर्थात याचे औचित्य साधून राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने यावर्षी स्वच्छता, पर्यावरण संवर्धन ,आणि प्रवासी सुविधा वाढवण्यावर भर देणारे विविध उपक्रम राबविले जात आहेत. एसटी प्रवास अधिक सुरक्षित आरामदायी आणि आधुनिक करण्यासाठी महामंडळाने जुन्या झालेल्या बस गाड्या बंद करून नवीन बस गाड्या सुरू होणार असल्याचे जाहीर केले आहे. अर्थात यामुळे प्रवाशांना दर्जेदार सेवा मिळण्यास मदत होणार आहे. याशिवाय खाजगी कंत्राट पद्धतीला पूर्णविराम देऊन, स्वच्छतेवर अधिक भर देण्यात आलेला आहे .एसटी महामंडळाच्या या नव्या उपक्रमांचे स्वागत जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे अशासकीय सदस्य प्रमोद मानसिंगराव जाधव यांनी स्वागत करून प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर स्वच्छ व सुविधायुक्त होणार असल्याने समाधान व्यक्त केले.






