Thursday, November 5, 2026
spot_img
spot_img

आण्णा उर्फ भाऊसाहेब फडके यांची दौंड तालुका प्रतिनिधी म्हणून निवड

एक नजर महाराष्ट्र न्युज

बारामती प्रतिनिधी :

 

दौंड तालुक्यातील कानगाव येथील सामाजिक कार्यकर्ते आण्णा उर्फ भाऊसाहेब फडके यांची एक नजर महाराष्ट्र न्यूज च्या दौंड तालुका प्रमुख पदी निवड करण्यात आली.

 

त्यांना नियुक्तीपत्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष व बारामती येथील ज्येष्ठ विधी तज्ञ ॲड. सुधीर शरद पाटसकर यांच्या शुभहस्ते देण्यात आले.

 

यावेळी पुणे जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद, महाराष्ट्र शासनाचे सदस्य प्रमोद मानसिंगराव जाधव, कानगाव येथील सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब आडागळे यांसह मान्यवर उपस्थित होते.

 

पत्रकारितेच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न, स्थानिक समस्या आणि सामाजिक घडामोडींना वाचा फोडण्यासाठी ‘एक नजर महाराष्ट्र न्यूज’च्या वतीने संघटनात्मक विस्तार करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर आण्णा मधुकर फडके यांची दौंड तालुका प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली आहे.

 

दौंड तालुक्यातील नागरिकांचे प्रश्न, शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्य जनता तसेच विविध सामाजिक आणि सार्वजनिक विषयांना आपल्या बातम्यांच्या माध्यमातून योग्य व्यासपीठ मिळवून देण्याची जबाबदारी त्यांच्यावर राहणार आहे.

 

निष्पक्ष पत्रकारिता, लोकहिताचे प्रश्न आणि सत्य बातम्यांना प्राधान्य देत ‘एक नजर महाराष्ट्र न्यूज’च्या माध्यमातून ते आपली पत्रकारितेची वाटचाल करतील, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

 

त्यांच्या या निवडीबद्दल मुख्य संपादक भीमसेन जाधव यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

 

 

मुख्य संपादक

भीमसेन जाधव

एक नजर महाराष्ट्र न्यूज

 

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या