Sunday, August 23, 2026
spot_img
spot_img

खडकवासला धरण, ता. हवेली, जि. पुणे दि. ८/०७/२०२६

आज दि. ८/०७/२०२६ रोजी धरणाच्या पाणी पातळीमधील झपाट्याने होत असलेली वाढ व पाणलोट क्षेत्रामधील अतिपर्जन्यमानामुळे *आज ठीक पहाटे ३:४५ वा. खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये १४३९३ क्युसेक विसर्ग वाढवून २२,८८० क्युसेक्स इतका सुरू करण्यात येणार आहे.*

 

तसेच पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्याची शक्यता आहे याची नोंद घेण्यात यावी.

 

तरी सर्वांना याद्वारे विनंती करण्यात येते की, कृपया नदीपात्रात उतरू नये. आणि नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावीत. कृपया सखल भागातील संबंधीत नागरीकांना सूचना देण्यात याव्या आणि उचित कार्यवाही करण्यात यावी.सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घ्यावी. माहिती साठी सविनय सादर.

 

कार्यकारी अभियंता

  • खडकवासला पाटबंधारे विभाग.

पुणे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या