Sunday, August 23, 2026
spot_img
spot_img

नॅशनल पीपल्स पार्टीच्या ठाणे जिल्हा उपाध्यक्षपदी श्री. संदीप पाटे यांची नियुक्ती

एक नजर महाराष्ट्र न्यूज                               मुंबई: ( ठाणे)   नॅशनल पीपल्स पार्टी, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष मा. अमितदादा प्रकाश वेळुकर (पाटील) यांच्या आदेशानुसार व पक्ष संघटन बळकटीकरणाच्या उद्देशाने श्री. संदीप पाटे यांची ठाणे जिल्हा उपाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

 

सामाजिक व राजकीय क्षेत्रातील त्यांचा प्रदीर्घ अनुभव, जनसंपर्क, संघटन कौशल्य आणि पक्षाप्रती असलेली निष्ठा लक्षात घेऊन ही नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्ह्यात पक्षाची संघटना अधिक मजबूत होऊन पक्षाच्या विचारांचा प्रभावी प्रसार होईल, असा विश्वास पक्ष नेतृत्वाने व्यक्त केला आहे.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष मा. अमितदादा प्रकाश वेळुकर (पाटील) यांनी श्री. संदीप पाटे यांना शुभेच्छा देत पक्षाच्या ध्येय-धोरणांचा प्रसार करून सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी प्रभावीपणे कार्य करण्याचे आवाहन केले.

 

नॅशनल पीपल्स पार्टी परिवारातर्फे श्री. संदीप पाटे यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत असून त्यांच्या आगामी कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

 

– प्रसिद्धी विभाग

नॅशनल पीपल्स पार्टी, महाराष्ट्र प्रदेश

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या