एक नजर महाराष्ट्र न्युज पुणे :टाळ- मृदुंगाचा गजर अन् विठ्ठल रखुमाईचा जयघोष करत देहू नगरीतून संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे तर आळंदीहून ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे पंढरपुरकडे प्रस्थान झाले आहे. आज ज्ञानेश्वर माऊली आणि तुकोबा रायांच्या पालखीचे पुण्य नगरीत आगमन होत आहे. लाखो वारकऱ्यांसह दोन्ही पालख्यांचे स्वागत करण्यासाठी पुणेकर सज्ज झाले असून सुरक्षेच्या दृष्टीने वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत.
दोन्ही पालख्यांचे आज पुण्यनगरीत आगमन
आषाढी वारीनिमित्त संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे गुरुवारी, ९ जुलै २०२६ रोजी पुणे शहरात आगमन होत आहे. या पार्श्वभूमीवर पुणे वाहतूक पोलिसांनी शहराच्या वाहतूक व्यवस्थेत महत्त्वाचे बदल केले आहेत. प्रशासनाने जारी केलेल्या माहितीनुसार, पालखी मार्गावरील वाहतूक टप्प्याटप्प्याने बंद ठेवली जाणार आहे दोन्ही पालख्या वाकडेवाडी आणि पाटील इस्टेटमार्गे शहरात प्रवेश करतील. शिवाजीनगर, संचेती रुग्णालय, फर्ग्युसन रस्ता, खंडोजीबाबा चौक, टिळक चौक आणि लक्ष्मी रस्ता या मार्गावरून पालख्या आपल्या मुक्कामस्थळी (भवानी पेठ आणि नाना पेठ) पोहोचतील. पालखी सोहळा सुरू असताना या मार्गांवर आणि आसपासच्या रस्त्यांवर मोठी गर्दी असेल, त्यामुळे या मार्गांचा वापर टाळून पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. कुठे असेल मुक्काम?
पुण्य नगरीत प्रवेश केल्यानंतर माऊलींची पालखी भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरात, तर तुकाराम महाराजांची पालखी तेथूनच जवळ असलेल्या निवडुंगा विठोबा मंदिरात मुक्कामी जाते. पालख्यांसोबत आलेल्या दिंडेकऱ्यांची राहण्याची व्यवस्था महापालिका प्रशासनाने महापालिका शाळांमध्ये केली आहे. याच ठिकाणी पुणेकरांना दोन्ही पालख्यांचे दर्शन घेता येणार आहे. विशेष पार्किंग व्यवस्था
भाविकांच्या वाहनांसाठी शहरात १० ठिकाणी विशेष पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे:
टिळक आयुर्वेद महाविद्यालय (रास्ता पेठ)
ऑर्नेलास हायस्कूल (कॉटर गेट चौक)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाणिज्य व कला महाविद्यालय
लक्ष्मी मार्केट
स. गो. बर्वे प्राथमिक विद्यालय
रफी अहमद किडवाई हायस्कूल
शांताबाई लडकत प्राथमिक विद्यालय
मार्कंडेय विद्यालय
सावित्रीबाई फुले शाळा







Total Users : 254186