Monday, August 24, 2026
spot_img
spot_img

बॉक्स ऑफिसवर ‘स्वामीं’ची कृपा, ‘देऊळ बंद २’ने ओलांडला 90 कोटींचा टप्पा; प्रवीण तरडे म्हणतात, ‘खूप अवघड होतं’

देऊळ बंद २’ सिनेमानं ९० कोटींचा टप्पा पार केला असून प्रवीण तरडे यांनी यासंदर्भात पोस्ट शेअर केली आहे.                                                      मुंबई – प्रवीण तरडे यांचा ‘ देऊळ बंद २ ‘ हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलीच कामगिरी करत आहे. प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे ‘देऊळ बंद २’ सिनेमानं ९० कोटींचा आकडा पार केला आहे. ‘सैराट’ आणि ‘राजा शिवाजी’ या सिनेमानंतर ‘देऊळ बंद २’ ची १०० कोटींकडे वाटचाल सुरू आहे. त्यामुळे प्रवीण तरडे यांचा सिनेमा नवा रेकॉर्ड रचण्याच्या तयारीत आहे. प्रवीण तरडे यांनी सोशल मीडियावर यासंदर्भात पोस्ट शेअर केली असून सिनेमाच्या कमाईचे आकडे शेअर केले आहेत.                                  प्रवीण तरडे यांची पोस्ट

‘देऊळ बंद २’ हा सिनेमा २१ मे २०२६ रोजी ब्रम्हमुहुर्तावर प्रदर्शित झाला असून सिनेमा प्रदर्शित होऊन एक महिना झाला आहे. एक महिना होऊनसुद्धा सिनेमाला भरघोस प्रतिसाद मिळतोय. ‘देऊळ बंद २’ ने ९० कोटींचा आकडा पार केला आहे. भारतात प्रवीण तरडे यांच्या सिनेमानं ८८.२० कोटींची कमाई केली असून जगभरात ९३ कोटी ५० लाखांची कमाई केली आहे. याबद्दल प्रवीण तरडे यांनी पोस्ट शेअर करत लिहिलं की, ‘मित्रांनो नागराजच्या सैराटने खणलेल्या रस्त्यावरून रितेश राजा शिवाजी घेऊन डौलात निघाला त्याच्या मागोमाग आपला देऊळबंद-२ घेऊन मी १०० च्या शेवटच्या टप्प्यावर आलोय..’     खूप अवघड होतं सगळं पण स्वामींच्या आणि तुमच्या जीवावर शक्य झालं…मराठी सिनेमा मोठा होतोय…लवकरच मराठी सिनेमाचं तिसरे शतक साजरं करू’ असं प्रवीण यांनी शेवटी लिहिलं आहे.                                                              देऊळ बंद २’ ने ३२ दिवसांत भारतात ८८ कोटी २० लाखांची कमाई केली असून इतर देशात ४० कोटी २० लाखांची कमाई केली आहे. त्याचबरोबर तंबू शोमध्ये या सिनेमानं १ कोटी १० लाखांची कमाई केली.                                                     दरम्यान, ‘देऊळ बंद २’ या सिनेमाच्या शेवटी राघव शास्त्री म्हणजेच गश्मीर महाजनीची झलक दाखवण्यात आली. यावरून ‘देऊळ बंद ३’ची हिंट देण्यात आली असून प्रेक्षकही सिनेमाच्या तिसऱ्या भागासाठी उत्सुक झाले आहेत.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या