Friday, August 21, 2026
spot_img
spot_img

भाऊ काळे सरांचा शिक्षणासाठीचा संघर्ष प्रेरणादायी

बारामती :प्रतिनिधी  प्रमोद जाधव

पणदरे :अत्यंत गरीब कुटुंबात जन्माला येऊनही पी.एच.डी. पर्यंत शिक्षण प्राप्त करणारे भाऊ लक्ष्मण काळे यांचा जीवन जगत असतानाचा व त्यातूनही शिक्षण पूर्ण करण्याकरिता केलेला संघर्ष हा आताच्या पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे मत पुणे जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य प्रमोद मानसिंगराव जाधव यांनी व्यक्त केले. सरस्वती शिक्षण मंडळाचे नव महाराष्ट्र विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य भाऊ लक्ष्मण काळे यांचे सेवा निवृत्ती कार्यक्रमा प्रसंगी ते बोलत होते. यावेळी डॉ. गोविंदराव कोकरे, कल्याणराव जगताप, डी.बी. जगताप ,राजेंद्र कोकरे, के.वाय .जगताप, डॉ. अजित जगताप ,संजय महादेव जगताप , प्रा.अनिल धुमाळ, विद्यालयाचे प्राचार्य एम. एस. वाघ ,पर्यवेक्षक जी.एम.तारू, बाळासाहेब घुटे, अनिल तरडे, भालचंद्र काळे, सतीश काळे, शिवाजीराव काळे ,यांसह विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आजी-माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .ते पुढे म्हणाले दुष्काळाच्या वेळी विस्थापित झालेल्या मेंढपाळ कुटुंबात जन्माला आलेले भाऊ काळे यांनी अत्यंत जिद्दीने व चिकाटीने शिक्षण पूर्ण केलेले असून मराठी ,राज्यशास्त्र, इतिहास ,भूगोल ,या चार विषयात मास्टर डिग्री संपादित केलेली आहे . त्यांनी बी.एड.व बी.पी.एड. या शिक्षण क्षेत्रातील पदव्याही संपादित केलेल्या आहेत .ते यावरच थांबले नाहीत तर ग्रामीण भागातील जलस्रोत व पाणीपुरवठा या विषयावर पी.एच.डी .पूर्ण केली अर्थात हे सर्व करत असताना त्यांनी श्रीराम सहकारी साखर कारखाना फलटण येथे वेल्डर म्हणून काम केले व त्या कामातून आलेल्या पैशातून त्यांनी स्वतःचे शिक्षण पूर्ण करण्याचा प्रयत्न केला, अर्थात 29 जून 1995 ला नव महाराष्ट्र विद्यालयात ते उपशिक्षक म्हणून रुजू झाले व आज प्रदीर्घ 31 वर्षाच्या कारकिर्दी नंतर ते प्राचार्य म्हणून याच विद्यालयात सेवानिवृत्त होत आहेत .अर्थात विस्थापित मेंढपाळ कुटुंबात पाच बहिणी चार भाऊ अशा नऊ भावंडांच्या मोठ्या कुटुंबात जन्माला येऊनही त्यांनी घेतलेल्या पदव्या व प्राचार्य पदापर्यंत घातलेली गवसणी हे आजच्या पिढीला प्रेरणादायी असल्याचे मत प्रमोद जाधव यांनी यावेळी व्यक्त केले. सेवानिवृत्त होत असताना माझ्या मनाला खूप वेदना होत असल्याची भावना भाऊ काळे यांनी व्यक्त करून यापुढे गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मदत करणार असल्याचे सांगून त्यांनी एक लाख पन्नास हजार रुपयांचा धनादेश विद्यालयाचे प्राचार्य व सदस्य मंडळाकडे सुपूर्त केला. यावेळी विद्यालयाचे ग्रंथपाल रमेश मारुती गलांडे यांनाही सेवानिवृत्ती निमित्त सन्मानित करण्यात आले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्या भोसले ,यांनी तर आभार सुरेखा मोरे यांनी मानले .

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या