Friday, November 6, 2026
spot_img
spot_img

६१ तासांनंतर महामार्ग रोको आंदोलन मागे; पुणे-सातारा-कोल्हापूर महामार्गावरील ट्रॅफिकची स्थिती काय?

आजची मोठी बातमी

एक नजर महाराष्ट्र न्यूज

कोल्हापूर : राजू शेट्टी यांनी ६१ तासांनंतर आंदोलन स्थगित केले. पुणे-सातारा-कोल्हापूर महामार्गावरील वाहतूक पूर्ववत सुरू झाल्याने प्रवाशांना दिलासा.

राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या महामार्ग रोको आंदोलनाला अखेर ६१ तासांनंतर स्थगिती देण्यात आली आहे. आज शुक्रवारी पहाटे आंदोलन मागे घेण्यात आल्यानंतर पुणे-सातारा-कोल्हापूर अर्थात पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वरील वाहतूक पुन्हा सुरळीत झाली आहे. सलग तीन दिवस या महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने प्रवाशांसह वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले होते. आंदोलन थांबल्यानंतर महामार्ग मोकळा झाल्याने दिवाळीच्या प्रवासासाठी निघालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

तरी नवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला  रोज पहा एक नजर महाराष्ट्र न्यूज

बातमी तुमची नजर आमची

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या