रोज पहा एक नजर महाराष्ट्र न्यूज आजची सर्वात मोठी बातमी
महाराष्ट्रात साखरेनंतर आता अंड्यांचे भाव वाढले आहेत, एका अंड्याची किंमत 7-9 रुपयांपर्यंत पोहोचली आहे. इथेनॉल उत्पादनासाठी मक्याचा वापर वाढल्याने कोंबड्यांच्या खाद्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे पोल्ट्री उद्योगाची उत्पादन खर्च वाढला असून, गेल्या वर्षभरात अंड्यांच्या किंमतीत 35-40% वाढ झाली आहे. महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात साखर आणि कांद्याचे भाव वाढल्याने सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलेलं असतानाच आता सामान्यांना आणखी एक झटका बसला आहे. अंड्यांच्या किंमतीत एका झटक्यात वाढ झाली आहे. इथेनॉलसाठी कोंबडीचं खाद्य वापरलं जात आहे. म्हणजे कोंबडीला देण्यात येणारी मक्का इथेनॉल बनवण्यासाठी वापरली जात आहे. त्यामुळे कोंबड्यांच्या चाऱ्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी अंड्यांच्या किंमतीत वाढ करण्यात आली आहे. नॅशनल एग्ज कोऑर्डिनेशन कमिटी (NECC)च्या आकडेवारीनुसार, गेल्या एक वर्षात अंड्यांच्या किंमतीत 35-40 टक्क्यांनी वााढ झाली आहे. म्हणजे आता एका अंड्याची किंमत 7 रुपये झाली आहे. रिटेलमध्य एका अंड्याची किंमत 8.50 ते 9 रुपयांच्या दरम्यान आहे. खाद्यांचा पुरवठा कमी झाला
सरकारच्या इथेनॉल ब्लेंडिंग नियमाच्यानुसार तेल कंपन्यांना फ्यूल पंपावर विकण्यासाठी पेट्रोलमध्ये बायोफ्यूल मिसळणं आवश्यक आहे. ब्लेंडेड पेट्रोलमध्ये इथेनॉलचं प्रमाण 20 टक्क्यांपर्यंत वाढवल्यामुळे उत्पादनासाठी ऊस आणि मक्क्याचा वापर केला जातो. त्यामुळे साखर बनवणे आणि फिडस्टॉकसाठीच्या त्याच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. इथेनॉल बनवण्यासाठी मक्क्याचा वापर वाढल्याने पशूंच्या खाद्याचा पुरवठा कमी झाला आहे. त्यामुळे त्याच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. इथेनॉल बनवण्यासाठी मक्क्याचा वापर वाढल्याने पशूंच्या खाद्याचा पुरवठा कमी झाला आहे. त्यामुळे त्याच्या किमती 40 टक्क्यांनी वाढल्या आहेत.







Total Users : 254301