Wednesday, August 26, 2026
spot_img
spot_img

सर्वात मोठी बातमी ! मोदींची प्रकृती बरी नाही, अस्वस्थ, थकले… कुणी केला दावा?

आत्ताची सर्वात मोठी बातमी                                ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींच्या प्रकृतीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. मोदी थकले असून, त्यांना बोलताना-चालताना त्रास होत असल्याचे राऊत यांचे म्हणणे आहे. देशाच्या हितासाठी थकलेल्या व्यक्तीने नेतृत्व करू नये, असे आवाहन करत मोदी आणि अमित शाह यांनी सत्तेतून दूर व्हावे, अशी मागणी राऊत यांनी केली आहे.                                                                                                                    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रकृती बरी नाही. ते अस्वस्थ आहेत. चालताना आणि बोलताना ते जाणवतं. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरूही अखेरच्या काळात थकले होते. तसेच मोदीही थकले आहेत, असं सांगतानाच थकलेल्या माणसाने देशाचं नेतृत्व करू नये. देशहितासाठी मोदी आणि शाह यांनी सत्तेतून दूर गेलं पाहिजे, असं ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे. मीडियाशी संवाद साधताना राऊत यांनी मोदी थकल्याचा दावा केला आहे.                         मोदींना पाहिल्यावर ते अस्वस्थ असल्याचं दिसतं. त्यांना बोलताना, चालताना पाहिलं. थकलेले दिसतात. मोदी थकलेत हे त्यांचेच लोकं सांगतात. जसे नेहरू थकले होते. तसे मोदी थकले आहेत. शेवटच्या काळात नेहरू फार थकले होते. आता मोदीही फार थकले आहेत. थकलेल्या माणसाने देशाचं नेतृत्व करू नये. राष्ट्रहितासाठी मोदी आणि शाह यांनी दूर झालं पाहिजे. राष्ट्र प्रथम असेल तर त्यांनी सत्तेपासून दूर राहिलं पाहिजे. अन् मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहिलं पाहिजे. यालाच देशसेवा म्हणतात, असं संजय राऊत म्हणाले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या