Tuesday, June 16, 2026
spot_img
spot_img

माळेगाव कॉलनी शाळेमध्ये शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम उत्साहात साजरा

तुम्ही पाहत आहात एक नजर महाराष्ट्र न्यूज बातमी तुमची नजर आमची                                 बारामती (माळेगाव ) शैक्षणिक वर्ष 2026-2027 ची सुरुवात दिनांक 15/06/2026 रोजी सुरूवात होत असल्याने बारामती नगरपरिषदेच्या सर्व 17 शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम – 2026 चे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमासाठी आश्विनी सुरज सातव (नगरसेविका-बा.न.प),श्री.कृष्णमुर्ती जगताप (अध्यक्ष-शाळा व्यवस्थापन समिती माळेगाव कॉलनी),श्री.कल्याण पाचांगणे (माजी अध्यक्ष) व पालक वर्ग मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरस्वती मुर्ती पूजन व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.माळेगाव कॉलनी व आसपासच्या परिसरातील पहिली ते सातवी इयत्तेच्या नवीन विद्यार्थ्यांचा शाळा प्रवेशोत्सव विद्यार्थ्यांचे औक्षण करून खाऊ वाटप व सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमासाठी श्री.गजानन सरगर (मुख्याध्यापक),श्री.भैरवनाथ पर्वते,कल्पना चौधरी,प्रज्ञा शेंडे, कोमल जाधव,मनीषा जाधव-गोरे,नंदा जगताप यांनी विशेष परिश्रम घेतले.          रोज पहा. एक नजर महाराष्ट्र न्युज

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या