महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा अजित पवार यांनी आज पदभार स्वीकारला. यावेळी त्यांनी अजितदादांच्या विचारांचा वारसा जपण्याचे वचन देत भावूक ट्विट केले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात आज एका ऐतिहासिक अध्यायाची सुरुवात झाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुनेत्रा अजित पवार यांनी आज राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून मंत्रालयात अधिकृतपणे आपला पदभार स्वीकारला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवारांवर ही मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यावेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्यासह अनेक आमदार आणि पदाधिकारी उपस्थित होते. यानंतर आता त्यांनी एक ट्वीट करत महाराष्ट्राला वचन दिले आहे. सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारताच त्यांच्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवरुन एक ट्वीट केले आहे. दादांची जागा कोणीच घेऊ शकत नाही; पण त्यांच्या विचारांचा वारसा जपण्याचा आणि अधिक सक्षम महाराष्ट्र घडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी नक्की करेन, असे वचन सुनेत्रा पवार यांनी या एक नजर महाराष्ट्र न्युजवर दिले आहे.







Total Users : 254202