Friday, August 21, 2026
spot_img
spot_img

स्वातंत्र्य दिनानिमित्त उप विभागीय अधिकारी उत्तम दिघे यांच्या हस्ते ध्वजारोहण

बारामती दि. १५:भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त उप विभागीय अधिकारी उत्तम दिघे यांच्या हस्ते प्रशासकीय भवन येथे ध्वजारोहण करण्यात आले.

 

यावेळी नगराध्यक्ष सचिन सातव, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार, उपविभागीय पोलीस अधिकारी चेतन्य कदम, तहसीलदार स्वप्नील रावडे, गट विकास अधिकारी किशोर माने, नगर परिषदेचे मुख्याधिकारी पंकज भुसे, तालुका कृषी अधिकारी सचिन हाके, उपअधीक्षक भुमीअभिलेख संजय घोंगडे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, स्वातंत्र्य सैनिकांचे कुटुंबीय, नगरसेवक, पत्रकार, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या विद्यार्थांनी राष्ट्रगीत व राज्यगीत सादर केले.श्री. दिघे यांनी पोलीस पथकाची मानवंदना स्वीकारुन सर्व उपस्थित मान्यवरांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या