प्रमोद जाधव माळेगाव (प्रतिनीधी)विद्यार्थ्यांचा गुरु प्रति असणारा आदर महत्त्वपूर्ण असल्याचे उदगार ह.भ.प.प्रा. हनुमंत भोसले महाराज यांनी काढले. खांडज ता.बारामती येथील श्री दत्त मंदिरात गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. यावेळी ते बोलत होते .ते पुढे म्हणाले विद्यार्थी कितीही मोठा झाला तरी त्याची गुरुप्रती असणारी श्रद्धा, भावना व आपुलकी हे महत्त्वाची असते याचेच एक उदाहरण म्हणजे आज सर्व विद्यार्थी गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित राहून गुरू प्रति आदर व्यक्त करत आहेत हे महत्त्वपूर्ण असल्याचे सांगून विद्यार्थ्यांप्रति कृतज्ञता व्यक्त केली. दरम्यान
विद्यार्थी व विद्यार्थिनींनी गुरुजनांचे पाद्यपूजन केले.यावेळी प्रमोद मानसिंगराव जाधव,प्रा ज्ञानदेव बुरुंगले, शरद माने आर.बी. भोसले, एन्.के.जगताप, श्री वसंतराव गायकवाड ,बाळासाहेब वाघ अर्जुन चौगुले,यांनसह खांडज गावचे माजी सरपंच राजेंद्र भोसले ,माळेगाव कारखान्याचे माजी संचालक भालेराव बर्गे ,बारामती सहकारी बँकेचे माजी संचालक सुरेश देवकाते,यांनसह शिक्षक विद्यार्थी व भावीक उपस्थित होते. जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे अशासकीय सदस्य प्रमोद जाधव यांनी गुरुंप्रती आदर व्यक्त करत आपल्या मनोगता तून विद्यार्थ्यांचे गोड कौतुक केले.यावेळी शारदाबाई पवार विद्यालय कनिष्ठ महाविद्यालयाच्या सन 2002 इयत्ता दहावी बॅचच्या विद्यार्थ्यांनी अन्नदान केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा ज्ञानदेव बुरुंगले यांनी तर आभार स्वाती वाघमोडे यांनी मानले.







Total Users : 254186