Friday, June 12, 2026
spot_img
spot_img

बारामती-राहुरी पोटनिवडणूक: सुनेत्रा पवारांसह 23 उमेदवार रिंगणात; काटेवाडीत सुनेत्रा पवारांसह पवार कुटुंबाचे मतदान

एक नजर महाराष्ट्र न्युज बातमी                            : काटेवाडी

बारामती-राहुरी पोटनिवडणूक: सुनेत्रा पवारांसह 23 उमेदवार रिंगणात; काटेवाडीत सुनेत्रा पवारांसह पवार कुटुंबाचे मतदान

 

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघासाठी आज पोटनिवडणुकीचे मतदान पार पडत आहे. बारामतीसह राहुरी मतदारसंघातही मतदान प्रक्रिया सुरू असून, मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे. बारामतीत महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्यासह एकूण 23 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. सकाळी 9 वाजेपर्यंत बारामतीत सुमारे 8.1 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. मतदान केंद्रांवर मतदारांची गर्दी पाहायला मिळत असून, दिवसभरात मतदानाचा टक्का वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, सुनेत्रा पवार यांनी स्वतः मतदानाचा हक्क बजावला असून, पार्थ पवार यांनीही मतदान केलं आहे. काटेवाडी येथे पवार कुटुंबीयांनी मतदान करत लोकशाही प्रक्रियेत सहभाग नोंदवला. खासदार सुप्रिया सुळे, त्यांची मुलगी रेवती सुळे तसेच कुटुंबातील इतर सदस्यांनीही मतदान केलं. तसेच आमदार रोहित पवार यांनी कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला आहे. या पोटनिवडणुकीकडे राज्यभराचं लक्ष लागलं असून, निकालाबाबत उत्सुकता वाढत चालली आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या