आजची धक्कादायक बातमी बारामती डोरलेवाडी बारामती तालुक्यातील 26 वर्षीय युवकाचा उष्माघात आणि तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू..
महेश राजेंद्र लोणकर असे मृत्यू झालेल्या युवकाचे नांव..
बारामती : बारामती तालुक्यातील झारगडवाडी येथील 26 वर्षीय युवकाचा उन्हात क्रिकेट खेळत असताना चक्कर येऊन मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महेश राजेंद्र लोणकर ( वय 26 ) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नांव आहे. झारगडवाडी येथील लोणकर वस्ती याठिकाणी क्रिकेटचे सामने भरवण्यासाठी शेतामध्ये ग्राउंड तयार करण्याचे काम सुरू होते. महेश हा भर उन्हामध्ये क्रिकेट खेळत होता यामुळे तो अचानक चक्कर येऊन पडला यावेळी बरोबर असलेल्या मुलांनी त्याला तातडीने बारामतीतील खाजगी रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. भर उन्हात बाराच्या सुमारास क्रिकेट खेळल्याने महेश लोणकर याला उष्माघात आणि तीव्र हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाला असे त्याच्या नातेवाईकांनी सांगितले आहे. मयत महेश लोणकर हा एकुलता एक असल्याने त्याच्या मृत्यूने झारगडवाडी सह बारामती तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. महेश याच्यामागे आई आणि तीन विवाहित बहिणी असा परिवार आहे.






