Wednesday, November 4, 2026
spot_img
spot_img

कृषिमंत्र्यांच्याच गावात महसूल कामांसाठी पैशांची मागणी होत असल्याचा आरोप; महाराष्ट्रात सर्वसामान्यांचे काय होणार? – लासुर्णेकर ग्रामस्थांचा सवाल

एक नजर महाराष्ट्र न्यूज                             लासुर्णे, ता. इंदापूर (पुणे) – राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचे मूळ गाव असलेल्या इंदापूर तालुक्यातील लासुर्णे गावातूनच महसूल प्रशासनाबाबत धक्कादायक तक्रार पुढे आली आहे.

 

येथील मंडल कार्यालयात रेशन कार्ड, फेरफार नोंदी लावणे, दुरुस्ती करणे यांसारख्या कामांसाठी सर्वसामान्य नागरिकांकडे पैशांची मागणी केली जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

 

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, पैसे दिल्याशिवाय फाईल पुढे सरकत नाही. यासंदर्भातील एक कथित व्हिडिओ देखील ग्रामस्थांनी पुरावा म्हणून सादर केला असून, त्या व्हिडिओची सत्यता आणि संभाषणाची स्वतंत्र पडताळणी होणे बाकी आहे.

 

ग्रामस्थांचा सवाल आहे की, “ज्या गावात राज्याचे कृषिमंत्री लक्ष देतात, तिथेच जर सर्वसामान्य शेतकऱ्याला, गरिबाला त्याच्या हक्काच्या कामासाठी पैसे मोजावे लागत असतील, तर राज्यातील इतर दुर्गम भागात सर्वसामान्यांचे कसे होत असेल?”

 

या प्रकरणी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी पुणे आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB – 1064) यांच्याकडे तक्रार करून या संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी करावी आणि संबंधित व्हिडिओची फॉरेन्सिक तपासणी करावी, अशी मागणी केली आहे.

 

या प्रकरणी मंडल प्रशासनाकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. प्रशासनाची बाजू आल्यावर ती प्रसिद्ध केली जाईल.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या