Wednesday, November 4, 2026
spot_img
spot_img

बारवनगर येथे माळेगाव पोलिसांची धडक कारवाई; बेकायदेशीर शस्त्रसाठा जप्त

एक नजर महाराष्ट्र न्युज                                     बारामती (माळेगाव ) माळेगाव पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे बारवनगर, ता. बारामती, जि. पुणे येथे बेकायदेशीररीत्या घातक शस्त्रे बाळगणाऱ्या इसमाविरुद्ध माळेगाव पोलिसांनी कारवाई करून तलवारी, कोयता, सत्तुर, सुरा व कु-हाड अशी एकूण ७ घातक शस्त्रे जप्त केली आहेत.

 

दि. १८/०९/२०२६ रोजी सायंकाळी सुमारे ०६.०० वाजता मौजे बारवनगर गावच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली.

 

याप्रकरणी दादा नथुराम शिंदे, रा. बारवनगर, ता. बारामती, जि. पुणे याच्याविरुद्ध माळेगाव पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. २५४/२०२६, शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ४, २५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

कारवाईदरम्यान आरोपीच्या राहत्या घरासमोरील परिसरातून खालील शस्त्रे जप्त करण्यात आली—

 

1. स्टीलची तलवार – अंदाजे किंमत ₹५००/-

2. लोखंडी तलवार – अंदाजे किंमत ₹४००/-

3. स्टीलची तलवार – अंदाजे किंमत ₹२००/-

4. लोखंडी कोयता – अंदाजे किंमत ₹१००/-

5. लोखंडी सत्तुर – अंदाजे किंमत ₹२००/-

6. लोखंडी सुरा – अंदाजे किंमत ₹१००/-

7. लोखंडी पाते असलेली कु-हाड – अंदाजे किंमत ₹१००/-

 

एकूण किंमत ₹१,६००/- इतका मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

 

सदर आरोपीकडे कोणताही वैध परवाना नसताना वरीलप्रमाणे घातक शस्त्रे बेकायदेशीररीत्या बाळगल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

माळेगाव पोलीस ठाणे हद्दीमध्ये जुन २०२६ पासून एकूण ४ अग्निशत्रे व १२ हत्यारे जप्त करून एकूण ८ गुन्हे दाखल करून १३ आरोपी विरुद्ध कारवाई करणेत आली आहे.

सदरची कामगिरी मा. संदीपसिहं गिल पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, मा. गणेश बिरादार अपर पोलीस अधीक्षक बारामती विभाग, मा. चैतन्य कदम उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ माळेगाव पोलीस स्टेशन,पोलीस उपनिरीक्षक देविदास साळवे, संजय मोहिते, पोलीस अंमलदार अजय अवघडे, वैभव मोहोळकर, विजय वाघमोडे,महेश पठारे ज्ञानेश्वर मोरे, राजू शिंदे, अमोल वाघमारे, सागर पवार यांनी केली आहे.

 

माळेगाव पोलीस स्टेशन

पुणे ग्रामीण

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या