Wednesday, November 4, 2026
spot_img
spot_img

नॅशनल पीपल्स पार्टी मध्ये लवकरच संघटनात्मक बदल

एक नजर महाराष्ट्र न्युज                              नॅशनल पीपल्स पार्टी – महाराष्ट्र प्रदेश              संघटनात्मक पुनर्रचना व पूर्वीच्या नियुक्त्यासंघटनात्मक पुनर्रचना व पूर्वीच्या नियुक्त्या/जबाबदाऱ्यांचे पदमुक्त

 

नॅशनल पीपल्स पार्टी – महाराष्ट्र प्रदेशातील सर्व पदाधिकारी, सभासद व कार्यकर्त्यांना याद्वारे सूचित करण्यात येते की, पक्षाचे नवीन संघटनात्मक धोरण, सामाजिक बांधिलकी, पक्षशिस्त व आगामी संघटनात्मक विस्तार लक्षात घेऊन दिनांक 04 सप्टेंबर 2025 पर्यंत करण्यात आलेल्या सर्व पदनियुक्त्या, सभासदत्वाशी संबंधित पूर्वीच्या नोंदी व पक्षाकडून सोपविण्यात आलेल्या संघटनात्मक जबाबदाऱ्यांचे पुनरावलोकन करण्यात येत आहे.

 

त्या अनुषंगाने, सदर दिनांकापर्यंतच्या सर्व नियुक्त्या व सोपविण्यात आलेल्या जबाबदाऱ्या तत्काळ प्रभावाने स्थगित/रद्द समजण्यात येतील. संबंधित कोणत्याही व्यक्तीस नव्याने अधिकृत नियुक्ती होईपर्यंत पक्षाचे नाव, पदनाम, लोगो, लेटरहेड किंवा पक्षाचे अधिकृत प्रतिनिधित्व करण्याचा अधिकार राहणार नाही.

 

पक्षाची राज्य, जिल्हा, शहर, तालुका, विधानसभा मतदारसंघ, प्रभाग/वॉर्ड व बूथ स्तरावरील तसेच विविध आघाड्या व सेलची नव्याने संघटनात्मक रचना लवकरच करण्यात येणार असून, याबाबत स्वतंत्र अधिकृत परिपत्रक प्रसिद्ध करण्यात येईल.

 

पक्षामध्ये सभासद किंवा पदाधिकारी म्हणून कार्य करण्यास इच्छुक व्यक्तींनी आपली नावे व आवश्यक माहिती नॅशनल पीपल्स पार्टी – महाराष्ट्र प्रदेश कार्यालयाकडे सादर करावी. संबंधित व्यक्तीचे सामाजिक व संघटनात्मक कार्य, कार्यअहवाल, जनसंपर्क, पक्षनिष्ठा व शिस्त यांचा विचार करून सक्षम पक्षीय प्राधिकरणामार्फत योग्य ती नियुक्ती करण्यात येईल. नाव सादर केल्याने नियुक्तीचा कोणताही अधिकार प्राप्त होणार नाही.

 

पूर्वी नियुक्त असलेल्या व्यक्तींनाही त्यांच्या कार्याचा आढावा घेऊन नव्या संघटनात्मक रचनेत पुनर्नियुक्तीची संधी देण्यात येऊ शकते.

 

तसेच, महाराष्ट्रात पुणे किंवा मुंबई येथे राष्ट्रीय नेतृत्वाच्या उपस्थितीत भव्य कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्याचा मानस असून, नव्याने नियुक्त होणाऱ्या सभासद व पदाधिकाऱ्यांना पक्षाच्या कार्याची दिशा व संघटनात्मक मार्गदर्शन देण्यात येईल.

 

वरील आदेशाचे उल्लंघन करून पक्षाचे नाव, पद किंवा अधिकृत प्रतिनिधित्वाचा अनधिकृत वापर केल्यास संबंधित व्यक्तीविरुद्ध पक्षाच्या संविधान, नियमावली व लागू कायद्यांनुसार योग्य ती संघटनात्मक/शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात येईल.

 

सदर नोटीस सर्व संबंधितांनी गांभीर्याने घेऊन पक्षशिस्त व संघटनात्मक प्रक्रियेस सहकार्य करावेत                                                         मा. श्री. अमितदादा प्रकाश वेळुकर
प्रदेशाध्यक्ष नॅशनल पीपल्स पार्टी महाराष्ट्र प्रदेश यांनी पत्रकारांना दिली माहिती                              संपादक एक नजर महाराष्ट्र भीमसेन जाधव

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या