Saturday, August 22, 2026
spot_img
spot_img

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात ‘संवाद वारी’ प्रदर्शन

नागरिकांना प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन

 

बारामती, दि. १४: श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासोबत पालखी मुक्कामाच्या ठिकाणी राज्य शासनाच्या विविध विभागांच्या ठळक लोककल्याणकारी योजना, उपक्रमांची माहिती देणाऱ्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय मार्फत आयोजित ‘संवाद वारी’या चित्र प्रदर्शनाचे, एलईडी व्हॅन, कलापथक व्हॅन तसेच चित्ररथ असून तालुक्यात आज उंडवडी गवळ्याची पालखीतळ आणि बारामती शहरात नगर परिषद परिसरात १५ जुलै रोजी असणार आहे.

 

श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासोबत पालखी मुक्कामाच्या ठिकाणी हे प्रदर्शन मांडणी करण्यात येत असून मुक्काम तळांसोबत संपूर्ण मार्गावर चित्ररथ, कलापथक तसेच एलइडी व्हॅनच्या माध्यमातून शासकीय योजनांची जनजागृती करणार आहेत.

 

प्रदर्शनात ३० फ्लेक्स पॅनेलचा समावेश आहे. या उपक्रमात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६, महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण, कौशल्य विकास व गुंतवणूक, महाराष्ट्र कृषी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) धोरण, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, नवीन शैक्षणिक धोरण २०२०, कृषी विभागाचे डिजिटल उपक्रम, जलयुक्त शिवार, गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार; महात्मा फुले जनआरोग्य योजना, कामगार कल्याण योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, प्रधानमंत्री पीक विमा योजना (सुधारित), नमो शेतकरी महासन्मान निधी, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, मागेल त्याला शेततळे, लेक लाडकी योजना, पीएम यशस्वी शिष्यवृत्ती योजना, आश्रम शाळा सुविधा, हरित ऊर्जा, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, महाराष्ट्र गृहनिर्माण योजना, दिव्यांग धोरण, शाश्वत जलसंपदा व्यवस्थापन व विकास, आपत्ती व्यवस्थापन, महाराष्ट्र रोजगार हमी योजना आदी योजनांबाबत आकर्षक एलईडी चित्ररथ तसेच पथनाट्य व प्रदर्शनाद्वारे जनजागृती करण्यात येत आहेत.

 

नागरिकांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने करण्यात येत आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या