Saturday, August 22, 2026
spot_img
spot_img

विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेअंतर्गत घरभेटींची जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडून पाहणी

एक नजर महाराष्ट्र न्युज                                पुणे, दि. ५ जुलै : भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत बूथस्तरीय अधिकारी सध्या घरोघरी जाऊन मतदारांना

प्रगणना नमुना अर्ज वितरित करून आवश्यक माहिती संकलित करत आहेत. या घरभेटी मोहिमेची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी आज शिवाजीनगर, हडपसर आणि पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील विविध मतदान केंद्र परिसरांना भेट दिली.

 

यावेळी त्यांनी बीएलओंकडून सुरू असलेल्या घरभेटींच्या कामकाजाची माहिती घेतली तसेच मतदारांना प्रगणना फॉर्मचे वितरण, माहिती संकलन आणि पडताळणीची प्रक्रिया तपासली. नागरिकांना आवश्यक माहिती देऊन सहकार्य करण्याचे आवाहन करत त्यांनी कोणताही पात्र मतदार मतदार यादीतून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना बीएलओंना दिल्या.

 

जिल्हाधिकारी डुडी यांनी मतदार यादीतील माहिती अचूक, अद्ययावत आणि विश्वासार्ह करण्यासाठी ही मोहीम अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले. नागरिकांनी बीएलओंना आवश्यक कागदपत्रे व अचूक माहिती वेळेत उपलब्ध करून देत या लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन त्यांनी केले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या