Sunday, August 23, 2026
spot_img
spot_img

ग्रामीण रुग्णालय बावडा… कोट्यवधींची इमारत, पण रुग्णांना अजूनही मूलभूत सुविधांचा अभाव!

एक नजर महाराष्ट्र न्युज                                       इंदापूर (बावडा ) ग्रामीण रुग्णालय, बावडा, ता. इंदापूर, जि. पुणे

अंदाजे चार ते पाच वर्षांपूर्वी उभारण्यात आलेले ग्रामीण रुग्णालय आजही पूर्ण क्षमतेने कार्यरत नसल्याची परिस्थिती असून, ग्रामीण भागातील नागरिकांना अपेक्षित आरोग्यसेवा मिळत नसल्याची खंत व्यक्त केली जात आहे.

दररोज ८० ते १२० रुग्णांची ओपीडी सुरू असतानाही रुग्णालयातील अनेक गंभीर त्रुटी अद्याप कायम आहेत.

रुग्णालयातील प्रमुख समस्या : ▪️ रुग्णालयासाठी आवश्यक तपासणी यंत्रसामग्री उपलब्ध असूनही त्यातील काही यंत्रे अद्याप बॉक्समधून बाहेर काढून कार्यान्वित करण्यात आलेली नाहीत.

▪️ उपलब्ध वैद्यकीय मशिनरीची योग्य प्रकारे स्थापना व वापर करण्यात आलेला नाही.

▪️ लॅब व ड्रेसिंग रूमचे दरवाजे मोडकळीस आले आहेत.

▪️ निकृष्ट दर्जाचे दरवाजे बसविण्यात आल्याचा आरोप असून, या कामाची सखोल चौकशी करून संबंधित ठेकेदारावर कठोर कारवाई करण्यात यावी.

▪️ पिण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था नाही.

▪️ रुग्णालय परिसरात मोठ्या प्रमाणात झाडेझुडपे वाढल्याने परिसराची दुरवस्था झाली असून स्वच्छतेचा अभाव स्पष्ट दिसून येतो.

इतकी गंभीर परिस्थिती असतानाही इंदापूर तालुक्याचे लोकप्रतिनिधी आमदार दत्तात्रय (मामा) भरणे आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी या प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन रुग्णालयातील त्रुटी दूर करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.

ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा मिळणे हा त्यांचा अधिकार आहे. त्यामुळे शासनाने तातडीने रुग्णालयाची पाहणी करून आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, उपलब्ध यंत्रसामग्री त्वरित कार्यान्वित करावी, तसेच दोषी अधिकारी किंवा ठेकेदार जबाबदार आढळल्यास त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी.

अन्यथा, शासनाने व प्रशासनाने तातडीने दखल न घेतल्यास क्रांतीसूर्य सामाजिक संघटना, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने तीव्र व व्यापक जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा महासचिव अनिल दणाणे यांनी दिला.

यावेळी क्रांतीसूर्य सामाजिक संघटना, महाराष्ट्र राज्य कमिटी अध्यक्ष हेमंत जावीर तसेच जिल्हाध्यक्ष अनिल बागाव उपस्थित होते.

“ग्रामीण जनतेच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही!”

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या