आजची सर्वात मोठी बातमी एक नजर महाराष्ट्र न्यूज वरती मुंबई : 1जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी व्यावसायिकांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय समोर आला आहे. तेल विपणन कंपन्यांनी 19 किलोच्या कमर्शियल एलपीजी सिलिंडरच्या किमतीत तब्बल ₹183.50 पर्यंत कपात जाहीर केली आहे जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच व्यावसायिकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. तेल विपणन कंपन्यांनी 1 जुलै 2026 पासून एलपीजी सिलिंडरचे नवे दर लागू केले आहे. 19 किलोच्या कमर्शियल एलपीजी सिलिंडरच्या किमतीत मोठी कपात करण्यात आली आहे. सलग अनेक महिन्यांपासून वाढत असलेल्या दरांनंतर प्रथमच झालेल्या या निर्णयामुळे हॉटेल, रेस्टॉरंट, ढाबे आणि इतर व्यावसायिकांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.
दरम्यान, घरगुती वापराच्या 14.2 किलोच्या एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तेल विपणन कंपन्यांनी 1 जुलै 2026 रोजी एलपीजी सिलिंडरचे सुधारित दर जाहीर केले. त्यानुसार 19 किलोच्या कमर्शियल एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कमाल 183.50 रुपयांपर्यंत कपात करण्यात आली आहे. त्यामुळे व्यावसायिक वापरासाठी एलपीजीवर अवलंबून असलेल्या व्यवसायांना मोठा दिलासा मिळाला आहे.







Total Users : 254186