एक नजय महाराष्ट्र न्युज ता. बारामती (मेडद मा.श्री. संदिपसिंह गिल्ल सोो. पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण तसेच माश्री गणेश बिरादार साो. अपर पोलीस अधीक्षक, बारामती पुणे ग्रामीण यांनी अवैध प्रतिबंधीत गुटखा विकी, वाहतुक व साठवणुक करणारे यांचा शोध घेवून कारवाई करणेबाबत आदेश दिलेले आहेत. त्या प्रमाणे श्री कुलदिप संकपाळ, सहा. पोलीस निरीक्षक, प्रभारी अधिकारी माळेगाव पोलीस ठाणे हे पोलीस ठाणे हद्दीत अवैध धंदयांची माहिती घेत असताना त्यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, मेडद येथिल रामदास बाळू मोरे हा चोरून प्रतिबंधीत गुटख्याची विकी करीत असून त्याने चोरून कोठे तरी गुटख्याची साठवणुक केलेली आहे. अशी बातमी मिळताच श्री. कुलदिप संकपाळ यांनी लगेच गुन्हे शोध पथकास सदर इसमास ताब्यात घ्या, असे कळविले वरून रामदास बाळू मोरे यास ताब्यात घेवून त्यांचे समक्ष हजर करताच त्याने गुन्हयाची कबुली देवून गुटखाजन्य माल साठविलेले ठिकाण दाखविण्याचे देखील कबुल केले त्यावेळी अन्न व औषध प्रशासन, पुणे या कार्यालयाचे श्री लक्ष्मीकांत सावळे यांना संपर्क करून माहिती दिली असता ते तात्काळ पुणे येथून निघून माळेगाव पोलीस ठाणे येथे आले त्यानंतर ते आरोपी व दोन पंच तसेच पोलीस स्टाफ असे आरोपीने दाखविलेले ठिकाणी जावून पाहणी केली असता मेडद गावचे हद्दीतील मोरेवाडी मधील शेती गट नंबर ५७४ मध्ये असलेल्या आरोपीच्या घरामध्ये एकुण ३,५७,३२१ (तिन लाख सत्तावन्न हजार तिनशे एकविस रूपये फक्त) रूपये किंमतीचा प्रतिबंधीत गुटखा मिळुण आला
त्यावेळी ताब्यात घेण्यात आलेला आरोपी रामदास बाळू मोरे यास अन्न सुरक्षा आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य शासन राजपत्र अधिसूचना क. असुचना क असुमाअ / अधिसूचना/४११/२०२५/७, दि.१६/०७/२०२५ नुसार सार्वजनिक आरोग्याच्या हितासाठी सुगंधित तंबाकू, गुटखा, पानमसाला, सुगंधित / स्वादिष्ट सुपारी व तत्सम पदार्थांचे महाराष्ट्र उत्पादन, साठा, वितरण किंवा विकी यावर दि.२०/०७/२०२५ रोजी पासून एक वर्षाचे कालावधीकरीता बंदी घातलेली आहे याबाबत माहिती आहे अगर कसे याबाबत त्याच्या चौकशी केली असता त्यांने ते माहिती असल्याचे सांगून त्याचे ताब्यात मिळुण आलेला माल पुरवठा करणार गौरव जोगदंड रा. तांदुळवाडी, बारामती जि.पुणे व गणेश मदने रा.बारामती जि.पुणे असे यांची नावे कळविलेली असता श्री. लक्ष्मीकांत सावळे, अन्न व औषध प्रशासन पुणे यांनी त्याचे विरूध्द सरकातर्फे फिर्यादी देली असून आरोपीस अधिक तपासाकरीता अटक करण्यात आलेली असून त्याची दि.३०/०६/२०२६ रोजी पासून ते दि ०४/०७/२०२६ रोजी पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजुर करवून घेवून गुन्हयाचा सखोल तपास चालू आहे.
तसेच मिळुन आलेल्या आरोपी विरूध्द यापुर्वी माळेगाव पोलीस ठाणे गुन्हा रजि.नं. ७४/२०२२ भा.दं.वि.क. ३२८, १८८, अन्नसुरक्षा मानके अधि, २००६ चे नियम ११ चे कलम २६ (१),२६ (२), (ए), २७ (३) (ई), ५९ प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामिण श्री. संदिपसिंह गिल्ल सोो, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार सोा., उपविभागीय पोलीस अधिकारी मधुकर भट्टे सोो. यांचे मार्गदर्शनाखाली आम्ही सपोनि कुलदिप संकपाळ तसेच पोलीस उपनिरीक्षक, देविदास साळवे, पोलीस अंमलदार विजय वाघमोडे, राहुल पांढरे, अमोल राऊत, ज्ञानेश्वर मोरे, भैरवनाथ बोराटे, सागर शिंदे, जयसिंग कचरे, अमोल कोकरे, अमोल वाघमारे, धिरज कांबळे, सागर पवार या अधिकारी व अंमलदार यांनी उपरोक्त उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे.







Total Users : 254190