Sunday, August 23, 2026
spot_img
spot_img

पत्रकारांशी झालेल्या वादावर खासदार संजय पाटील यांची दिलगिरी

एक नजर महाराष्ट्र न्यूज मुंबई                        मुंबई:               शिवसेनेचे खासदार संजय पाटील यांनी पत्रकारांशी झालेल्या वादप्रकरणी जाहीर दिलगिरी व्यक्त केली आहे. वादाच्या प्रसंगी अनवधानाने वापरलेल्या अपशब्दांबद्दल त्यांनी संपूर्ण माध्यम समूहाची माफी मागितली आहे. तसेच, “माझ्या राजकीय भूमिकेवर जरूर टीका करा; परंतु माझ्या कुटुंबाला आणि विशेषतः दिवंगत वडिलांना राजकारणात खेचू नका,” अशी भावनिक विनंतीही त्यांनी या वेळी केली.

 

या संदर्भात बोलताना खासदार संजय पाटील म्हणाले, “मी शिवसेनेत प्रवेश केल्यापासून मला सातत्याने अपमानित केले जात आहे. आज सकाळी पत्रकार मित्र पुन्हा आले तेव्हा मी त्यांना हात जोडून विनंती केली होती की, या विषयावर मला आता काहीही बोलायचे नाही. मात्र, वारंवार तोच प्रश्न विचारण्यात आल्यामुळे वाद वाढला. त्या गडबडीत माझ्याकडून चुकीने अपशब्द निघाले. त्याबद्दल मी सर्व पत्रकार बंधू-भगिनींची मनापासून माफी मागतो.”

 

विरोधकांनी किंवा अन्य कोणीही माझ्यावर टीका करण्यास माझी हरकत नाही. परंतु, माझ्या पत्नी, मुलगी, आई आणि जे वडील आज हयात नाहीत, त्यांच्याबद्दल खोट्या गोष्टी पसरवणे आणि अपशब्द वापरणे चुकीचे आहे. माझ्या राजकीय भूमिकेवर तुम्हाला जे बोलायचे आहे ते जरूर बोला, पण कृपया माझ्या कुटुंबाला यापासून दूर ठेवा अशी विनंती त्यांनी केली .

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या