Sunday, June 14, 2026
spot_img
spot_img

तुकाराम मुंढेंच्या पथकाची स्वारगेट बस स्टॉपवरील दुकानांवर धाड; …तोपर्यंत दुकानं बंद ठेवण्याच्या सूचना

एक नजर महाराष्ट्र न्युज                                 पुणे : अन्न पदार्थांमधील भेसळींवर कारवाई तर होतेच आहे, पण तंबाखू, तबाखूजन्य पदार्थ, गुटखा, पानमसाला अशा प्रतिबंधित पदार्थांवरही कारवाईचा धडका सुरु आहे.                                अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्त पदाची सूत्रं हाती घेतल्यापासून आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी भेसळखोरांवरील कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. आतापर्यंत मुंढेंच्या पथकांनी शेकडो कारवाया केल्या असून अनेकांवर गुन्हे दाखल केले आहेत. शनिवारी पुण्यातील स्वारगेट परिसरात धडक कारवाई करण्यात आली.                                                अन्न पदार्थांमधील भेसळींवर कारवाई तर होतेच आहे, पण तंबाखू, तबाखूजन्य पदार्थ, गुटखा, पानमसाला अशा प्रतिबंधित पदार्थांवरही कारवाईचा धडका सुरु आहे. विशेष म्हणजे या गुन्ह्यांतील आरोपींवर मकोका लावण्याचा निर्णय अन्न व औषध प्रशासनाने घेतला आहे.

 

अन्न व औषध प्रशासन विभागाच्या राज्यातील अनेक शहरांमध्ये कारवाया सुरु आहेत. पुण्यातदेखील भेसळखोरांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येतोय. शनिवारी (दि. १३) पुण्यातील स्वारगेट बसस्टॉप परिसरात असलेल्या दुकानांवर तुकाराम मुंढेंच्या                                                अन्न व औषध विभागाचं पथक सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या दरम्यान स्वारगेट पोलिस ठाण्यात दाखल झालं. त्यानंतर अचानकपणे परिसरातील विविध दुकानांमध्ये पाहाणी करण्यात आली. यावेळी अधिकाऱ्यांनी दुकानदारांना योग्य त्या सूचना केल्या.

जोपर्यंत खाद्यपदार्थांच्या दुकानांमध्ये योग्य ती स्वच्छता आणि इतर नियम पाळलं जात नाहीत, तोपर्यंत दुकानं बंद ठेवण्याच्या सूचना तुकाराम मुंढेंच्या पथकाने दिल्या आहेत. त्यामुळे स्वारगेट बसस्टॉप परिसरातील दुकानदारांना आपली दुकानं बंद करावी लागली.

 

दरम्यान, शुक्रवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये तुकाराम मुंढेंनी दूध आणि दुग्धजन्य पदार्थांतील भेसळ करणाऱ्यांना इशारा दिला आहे. जिथून दूध संकलन होतं, त्या गावपातळीपासून ते दूध डेअरी आणि दुधाचे पदार्थ तयार करणारे, विकणारे.. या सगळ्या साखळीवर कारवाई करण्याचे आदेश मुंढेंनी दिले आहेत. त्यामुळे भेसळखोरांचे धाबे दणाणले आहेत.

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या