बातमी लातूर मधून एक नजर महाराष्ट्र न्युज लातूर : महाराष्ट्रातील सरकारी राशन दुकाने लाभार्थ्यांना ५ किलो कमी राशन देतात, पण आतापर्यंत कोणीही यावर आक्षेप घेतला नाही. लातूर जिल्ह्यातील औराद शाहजानी येथून सामाजिक कार्यकर्ते प्रल्हाद सोनकंबळे यांनी हा मुद्दा उपस्थित केला आणि हा मुद्दा संपूर्ण महाराष्ट्रात पेटला .
प्रल्हाद सोनकांबळे यांनी महाराष्ट्राचे गब्बर म्हणून प्रसिद्ध असलेले रवीराज साबळे पाटील यांनाही हा विषय सांगितला आणि त्यांनी ही हा मुद्दा उचलून सर्व राशन दुकानदारांना इशारा दिला असून बदलाची मागणी केली .
सोनकाबळे यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील सर्व राशन दुकानें अनेक वर्षांपासून कमी राशन देत आले आहेत . काहींठिकाणी तर गरिबांच्या अशिक्षित्तेचा फायदा घेऊन 15-20 किलो राशन कमी देतात तर काहींना राशनच देत नाहीत .
खालील समस्यांना लाभार्थ्यांना तोंड द्यावे लागते .
१) लाभार्थ्यांना प्रति कुटुंब ५ ते 20 किलो कमी धान्य दिले जाते.
२) या दुकानांमध्ये लाभार्थ्यांना पावती दिली जात नाही, आणि
३) त्यांच्यासोबत अपमानास्पद, असभ्य आणि अनुचित वागणूक दिली जाते.
४) काही लाभार्थ्यांच्या निरक्षरतेचा फायदा घेऊन त्यांना धान्य नाकारले जाते.
प्रल्हाद सोनकंबळे यांनी या समस्यांबद्दल निलंगा तालुका कार्यालयातील तहसीलदारांकडे , पुरवठा अधिकारी अमोल पाटील व जिल्हा पुरावठा अधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे.
तहसीलदार आणि पुरवठा अधिकाऱ्यांकडे सादर केलेल्या तक्रार अर्जात, त्यांनी निलंगा तालुक्यातील सर्व सरकारी रेशन दुकानांना ५ किंवा १० किलो धान्य कमी दिल्याबद्दल किंवा पावती न दिल्याबद्दल नोटीस बजावण्याची विनंती केली आहे.
प्रल्हाद सोनकंबळे यांनी दंड म्हणून तहसीलदारांनी या दुकानांचे परवाने रद्द करावेत अशी मागणी केली आहे.
सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर, संपूर्ण महाराष्ट्रातून कॉल येत आहेत.
सोनकंबळे यांनी असेही म्हटले आहे की, रेशनची समस्या संपूर्ण महाराष्ट्रात आहे, पण कोणीही आवाज उठवत नाही.
जर या समस्या सोडवल्या नाहीत, तर विविध संघटना, पक्ष आणि लाभार्थी महिला यांच्या कडून तीव्र आंदोलन करन्यात येतील .






