पुणे : नॅशनल पीपल्स पार्टी – महाराष्ट्र प्रदेशमध्ये मोठी संघटनात्मक घोषणा करण्यात आली असून, दोन वेळा मेघालयाचे मुख्यमंत्री तसेच नॅशनल पीपल्स पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेले Conrad Sangma यांच्या आदेशानुसार आणि नॅशनल पीपल्स पार्टी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा. अमितदादा प्र. वेळूकर (पाटील) यांच्या नेतृत्वाखाली, सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक क्षेत्रात सक्रिय कार्य करणारे डॉ. निहाल राजू कांबळे पाटील यांची महासचिव – कोअर कमिटी, नॅशनल पीपल्स पार्टी महाराष्ट्र प्रदेश तसेच अध्यक्ष – नॅशनल पीपल्स पार्टी चित्रपट आघाडी महाराष्ट्र प्रदेश या महत्त्वपूर्ण पदांवर अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे. पक्ष संघटना मजबूत करणे, युवक व कलाकारांना पक्षाशी जोडणे, सांस्कृतिक व डिजिटल क्षेत्रात पक्षाची उपस्थिती वाढविणे आणि राज्यभर जनसंपर्क अधिक प्रभावी करणे या उद्देशाने ही जबाबदारी सोपविण्यात आली असून, नॅशनल पीपल्स पार्टी – महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने त्यांना पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात येत आहेत.






