Thursday, April 16, 2026
spot_img
spot_img

‘राजा शिवाजी’ सिनेमाच्या पहिल्या गाण्यात दिसली सिद्धार्थ जाधव, रेमो डिसूझाची झलक, अजय अतुलची चालली जादू

एक नजर महाराष्ट्र न्यूज                               मुंबई: अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट सध्या देशभर चर्चेत आहे. अभिनेता आणि दिग्दर्शक रितेश देशमुख याच्या या महत्त्वाकांक्षी प्रोजेक्टमधील पहिलं गाणे म्हणजेच ‘छत्रपती’ अँथम आज अधिकृतपणे प्रदर्शित करण्यात आलं आहे. हे गाणे ऐकताना प्रेक्षकांच्या अंगावर अक्षरशः शहारे येत असल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. अजय अतुलची जादू पुन्हा चालली, असं म्हटलं जात आहे.                           अजय-अतुलची जादू

या गाण्याची सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे दिग्गज लोकप्रिय जोडी अजय-अतुल यांचं संगीत. आपल्या खास शैलीत त्यांनी या अँथमला एक भव्य स्वरूप दिलं आहे. विशेष म्हणजे, या गाण्यासाठी तब्बल ८० गायकांच्या कोरसचा वापर करण्यात आला आहे, ज्यामुळं गाण्यातील उर्जा अनुभवायला मिळतोय. अजय गोगावले यांच्या खणखणीत आवाजानं या गाण्याला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं आहे.                       रेमो डिसूझाचं नृत्यदिग्दर्शन

केवळ संगीतच नाही, तर या गाण्याचे व्हिज्युअल्सही तितकेच प्रभावी आहेत. प्रसिद्ध कोरिओग्राफर रेमो डिसूझायांनी या गाण्याचं नृत्यदिग्दर्शन केलं आहे. तो स्वत:ही या गाण्यात दिसला आहे. भव्य सेट, भगवे झेंडे आणि नाशिक ढोलच्या तालावर पडणारी पावलं यामुळं हे गाणे प्रेक्षकांना थेट शिवकाळात घेऊन जातंय.

 

सिद्धार्थ जाधवनं वेधलं लक्ष

 

 

या गाण्यात सिद्धार्थ जाधव देखील लक्ष वेधून घेत आहे. शिवरायांचा मावळा म्हणून तो प्रेक्षकांच्या भेटीला आलाय.

या गाण्याबद्दल बोलताना संगीतकार अजय-अतुल म्हणाले की, हे गाणं फक्त भव्य असावं इतकंच आमचे ध्येय नव्हतं, तर त्यात भावना, प्रामाणिकपणा आणि आदराची जाणीव असणं अत्यंत महत्त्वाचे होतं. प्रत्येक सूरामध्ये एक जबाबदारी आहे आणि ती म्हणजे त्या वारशाचा सन्मान राखण्याची. आम्ही या गीतामधून श्रोत्यांच्या मनात अभिमानाची आणि प्रेरणेची ठिणगी पेटवण्याचा प्रयत्न केला आहे. जर या गीतामुळे प्रेक्षकांच्या अंगावर शहारे आले, तर ते आमच्यासाठी यश आहे; पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे, हे गीत त्यांच्या मनात कायम राहावं, हीच खरी आपल्या महाराजांसाठी मानवंदना ठरेल.

 

दिग्गज कलाकारांची फौज

 

 

‘राजा शिवाजी’ या चित्रपटात रितेश देशमुख स्वतः महाराजांच्या भूमिकेत दिसणार असून, त्यांच्यासोबत तगडी स्टारकास्ट आहे. संजय दत्त,अभिषेक बच्चन,विद्या बालन, महेश मांजरेकर,सचिन खेडेकर,जिनिलिया देशमुख यांच्या भूमिकेत.

 

 

“हे केवळ गाणं नाही, तर ही एक भावना आहे. शिवरायांचा वारसा आणि स्वराज्याची अस्मिता या गाण्यातून मांडण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे,” अशी प्रतिक्रिया रितेश देशमुखनं गाणं प्रदर्शित करताना दिली.

 

एक नजर महाराष्ट्र न्युज

 

 

 

कधी होणार प्रदर्शित?

 

जिओ स्टुडिओज आणि मुंबई फिल्म कंपनीची निर्मिती असलेला हा चित्रपट १ मे २०२६ रोजी ‘महाराष्ट्र दिना’चे औचित्य साधून जगभरात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट मराठीसह हिंदी भाषेतही रिलीज केला जाणार आहे.

 

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या