Wednesday, March 25, 2026
spot_img
spot_img

1500 रुपयांसाठी पुण्यातील 1200 पुरुष झाले ‘स्त्रिया’; आता अडीच लाख महिला टार्गेटवर

एक नजर महाराष्ट्र न्युज                                      सर्वात मोठी बातमी पुण्यामधून                          पुणे:  पुण्यात लाडकी बहीण योजनेबाबत एक हैराण करणारं प्रकरण समोर आलं आहे                 पुण्यातून एक विचित्र प्रकार समोर आलं आहे. पुण्यातील चक्क १२०० पुरुष स्त्रिया बनल्याची माहिती आहे. केवळ १५०० रुपयांसाठी हे पुरुष स्त्रिया बनल्याची माहिती समोर आली आहे.

 

नेमकं काय आहे प्रकरण?

लाडकी बहीण योजनेबाबत एक हैराण करणारं प्रकरण समोर आलं आहे. पुणे जिल्ह्यात अनेक लाडक्या बहि‍णींना ई-केवायसीनंतर १५०० रुपये मिळणं बंद झालं आहे. आता अडीच लाख बहि‍णींची पडताळणी केली जाणार आहे. हैराण करणारी बाब म्हणजे पुणे जिल्ह्यातून आतापर्यंत १२०१ पुरुष लाभार्थ्यांना लाडकी बहीण योजनेचा फायदा मिळत होता. यामध्ये हवेलीतील लाभार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे. ई-केवायसी पूर्ण केलेले लाभार्थी खरोखर पुरुष लाभार्थी आहेत का याचीही चौकशी करण्यात येणार आहे.

पुन्हा एकदा ई-केवायसीचे निर्देश

अद्यापही राज्यातील अनेक महिला लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणाऱ्या १५०० रुपयांच्या निधीपासून वंचित आहेत. अशात सरकारने लाडकी बहि‍णींना ई-केवायसी करण्याचे निर्देश दिले होते. यामध्ये अनेक अडचणीदेखील होत्या. अर्ज जमा केल्यानंतरही महिलांचा महिन्याचा निधी सुरू झालेला नाही. अनेक महिला लाभार्थ्यांच्या तक्रारींची दखल घेत, महिला आणि बालविकास विभागाने ई-केवायसी पूर्ण केलेल्या सर्व महिला लाभार्थ्यांची पुनर्पडताळणी करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हा प्रशासनाच्या निर्देशानुसार, ही पडताळणी आता अंगणवाडी सेविकांद्वारे केली जाईल.

 

कोणत्या गोष्टींचा होणार तपास…

याअंतर्गत महिला लाभार्थ्यांच्या घरातील कोणी व्यक्ती सरकारी नोकरीत आहे की नाही किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणी सदस्याला सरकारी पेन्शन मिळत आहे की नाही याचीही पुनर्पडताळणी करण्यात येणार आहे. जर लाभार्थ्यांच्या कुटुंबातील कोणी सरकारी पेन्शन घेत असेल तर अशा कुटुंबातील लाभार्थी अयोग्य मानली जाईल. पुण्यात महिलांप्रमाणे पुरुषही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याच्या तक्रारी येत आहेत. यानंतर सरकारने तपास करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी संबंधित जिल्ह्याच्या प्रशासकांना पुरुष लाभार्थ्यांचा शोध घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

 

 

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या