एक नजर महाराष्ट्र न्यूज बांगलादेश : हल्लेखोरांनी क्रूरतेचा कळस गाठत घरातील लोक बाहेर येऊ नयेत म्हणून दरवाजांना बाहेरून कड्या लावून घेतल्या होत्या.बांगलादेशमध्ये अल्पसंख्याक हिंदू समाजावर होणाऱ्या हल्ल्यांची मालिका सुरुच आहे. पिरोजपुर जिल्ह्यातून एक अतिशय धक्कादायक आणि अंगावर शहारे आणणारी घटना समोर आली आहे. येथे उपद्रवी घटकांनी हिंदूंच्या 5 ते 6 घरांना लक्ष्य करत त्यांना आग लावून दिली. ही घटना घडली तेव्हा कुटुंबातील सर्व सदस्य गाढ झोपेत होते. हल्लेखोरांनी क्रूरतेचा कळस गाठत घरातील लोक बाहेर येऊ नयेत म्हणून दरवाजांना बाहेरून कड्या लावून घेतल्या होत्या. या भीषण परिस्थितीतून कुटुंबातील सदस्यांनी कसाबसा आपला जीव वाचवला असला तरी, या घटनेने बांगलादेशातील हिंदूंच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
बांगलादेशात घरांना बाहेरून कुलूप लावून हिंदूंना जिवंत जाळण्याचा प्रयत्न; अंगावर बांगलादेशात घरांना बाहेरून कुलूप लावून हिंदूंना जिवंत जाळण्याचा प्रयत्न; अंगावर शहारे आणणारी घटना, हल्लेखोरांनी क्रूरतेचा कळस गाठत घरातील लोक
ही भयंकर घटना पिरोजपुर जिल्ह्यातील डुमरीतला गावात 27 डिसेंबर रोजी मध्यरात्री घडली. काही दिवसांपूर्वीच हिंदू युवक दीपू चंद्र दास याची निर्घृण हत्या करून त्याला जाळल्याची घटना ताजी असतानाच ही नवीन घटना समोर आली आहे. गावातील साहा कुटुंबासाठी ती रात्र एखाद्या भीषण स्वप्नासारखी ठरली. मिळालेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी पूर्ण नियोजित कट रचून घरांना घेराव घातला होता. त्यांनी घराच्या खोल्यांमध्ये कपडे कोंबून आग लावली आणि लोक बाहेर पळू नयेत यासाठी दरवाजांना बाहेरून कुलूप लावून घेतले. कुटुंबातील सदस्यांना जाग आली, तेव्हा त्यांचे घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होते. पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत 5 संशयितांना अटक केली असून इतर आरोपींचा शोध घेतला जात आहे. बांगलादेशातील या अस्थिर परिस्थितीमुळे स्थानिक हिंदूंमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.







Total Users : 254195