श्रीरामपूर : एक नजर महाराष्ट्र येथे विद्याराज फाउंडेशनच्या वतीने आयोजित महाराष्ट्र गौरव रत्न आदर्श शेळीपालक पुरस्कार डाळज नंबर 2,ता. इंदापूर, पुणे येथील शेळीपालक श्री. रोहित बाळासाहेब पानसरे यांना प्रदान करण्यात आला. बिटल शेळीपालनात उत्कृष्ट कार्य करत असलेल्या श्री. रोहित पानसरे यांना सिनेअभिनेते श्री. गणेश यादव आणि चित्रपट निर्माते श्री बाळासाहेब बांगर यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला.
महाराष्ट्रातील सर्व बिटल शेळीपालकांनी एकत्रित येऊन श्री. रोहित पानसरे यांची बिटल गोट ब्रिडर असोसिएशन, महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी निवड केली. तसेच त्यांनी सर्व शेळीपालकांना एकत्रित करून महाराष्ट्रात प्रथमच फक्त बिटल शेळ्यांचे स्पर्धा व प्रदर्शन भरविण्यात आले होते, सोबतच नवीन व्यवसायाची सुरुवात करणाऱ्या तरुणांसाठी प्रत्येक महिन्यात ट्रेनिंग बॅच घेऊन शेळीपालनाची संपूर्ण माहिती देण्यात येते.
शेळीपालनात काम करत असताना या सर्व गोष्टीच्या माध्यमातून शेळीपालनात क्रांती घडवण्याचे कार्य श्री. रोहित पानसरे यांच्याकडून होत असल्याने त्यांना महाराष्ट्र गौरव रत्न आदर्श शेळीपालक या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.






