Wednesday, November 4, 2026
spot_img
spot_img

सम्यक मोशन पिक्चर्स निर्मित सचिन रणपिसे दिग्दर्शित आपल्या बारामतीत निर्मिती झालेला चित्रपट स्वराज्य संविधान पार्ट १

एक नजर महाराष्ट्र न्यूज पहा

सम्यक मोशन पिक्चर्स निर्मित
सचिन रणपिसे दिग्दर्शित
आपल्या

एक नजर महाराष्ट्र न्यूज संपादक भीमसेन जाधव ता. बारामती                                        बारामतीत  निर्मिती झालेला चित्रपट
स्वराज्य संविधान पार्ट १                                     बारामती :या चित्रपटाचा फर्स्ट लुक व्हीडिओ इंस्टाग्राम युट्यूब वर आला आहे.

या चित्रपटात स्वराज्य रक्षक संभाजी मालिका फेम प्राजक्ता गायकवाड, देवमाणूस फेम वंदी आत्या पुष्पा चौधरी, सैराट फेम सुरेश विश्वकर्मा, फॅन्ड्री फेम जब्या सोमनाथ अवघडे, महेशदादा देवकाते, आदित्यराजे मराठे या कलाकारांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत.

चित्रपटाचे चित्रीकरणाची जबाबदारी साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील कॅमेरामन डी ओ पी फयाज अहमद यांनी पार पाडली आहे.

या चित्रपटात मोठ्या सेलिब्रिटी कलाकारां बरोबरच आपली मातीतील कलाकार शहाजी टिकरे विश्वतेज कदम तनवीर मुलाणी अझर शेख सोनू गायकवाड सागर सावंत, दीक्षा पवार, आर्या सकुंडे यांनीही मध्यवर्ती भूमिका केल्या आहेत हे आपल्या बारामती करांसाठी अभिमानाची गोष्ट आहे.

चित्रपटाचे पोस्ट प्रोडक्शन विजापूर व पुणे येथे सुरू असून शिवजयंतीमध्ये चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला सर्वत्र चित्रपटगृहांमध्ये येत आहे

 

तुम्ही पाहत आहात

एक नजर महाराष्ट्र न्यूज

बातमी तुमची नजर आमची

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या