एक नजर महाराष्ट्र न्युज प्रतिनिधी : प्रमोद जाधव श्री मरीमाता, लक्ष्मीआई व भिवाईमाता नवरात्र उत्सव मंडळ, पणदरे – बनकर वस्ती
नवरात्र उत्सवानिमित्त देवीची आरती थाटात संपन्न
पणदरे (ता. बारामती) – येथील श्री मरीमाता, लक्ष्मीआई व भिवाईमाता नवरात्र उत्सव मंडळ, बनकर वस्ती येथील नवरात्र उत्सवानिमित्त देवीची आरती माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन मा. नितीन दादा शेंडे, संचालक शिवराज जाधवराव व जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे महाराष्ट्र शासनाचे सदस्य प्रमोद जाधव यांच्या शुभहस्ते संपन्न झाली.
यावेळी कारखान्याचे व्हा. चेअरमन नितीन दादा शेंडे यांनी सर्व भाविकांना नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. नवरात्र उत्सवानिमित्त सार्वजनिक कार्यक्रमांबरोबरच शासनाच्या विविध योजना घरोघरी पोहचवण्याचे काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच रक्तदान शिबिरे, वृक्षारोपण, नेत्रदान, देहदान याविषयी समाजामध्ये जागृती निर्माण करावी, असेही ते म्हणाले.
मंडळाचे विशेष वैशिष्ट्य –
नवरात्र उत्सव कालावधीमध्ये बनकर वस्ती येथील ग्रामस्थ नियमित संध्याकाळी देवीच्या मंदिरापाशी सार्वजनिक अन्नदान करतात. या काळात वस्तीतील सर्व ग्रामस्थ मंदिरापाशीच सायंकाळी उपवास असेल तर फराळ आणि उपवास नसेल तर जेवण करण्याची प्रथा आहे. जर कोणाच्या घरी चूल पेटवली तर त्यास दंडात्मक कारवाई केली जाते, हे या मंडळाचे विशेष वैशिष्ट्य आहे. याबद्दल जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य प्रमोद जाधव यांनी येथील ग्रामस्थांचे कौतुक करून विशेष आभार मानले. पणदरे बनकर वस्ती येथे नवरात्र उत्सवानिमित्त देवीची आरती करताना व्हा. चेअरमन नितीन शेंडे, संचालक शिवराज जाधवराव व प्रमोद जाधव व ग्रामस्थ.
—
रोज पहा एक नजर महाराष्ट्र न्युज







Total Users : 256576