Wednesday, November 4, 2026
spot_img
spot_img

प्रा. डॉ. मंगेश फुटाणे यांचे कार्य गौरवास्पद – नितीन शेंडे

एक नजर महाराष्ट्र न्युज.                         प्रतिनिधी प्रमोद जाधव                            बारामती (माळेगाव बुद्रुक)  – अडॉ. मंगेश सुभाष फुटाणे हे गेली 14 वर्षे वाणिज्य विभागामध्ये ज्ञानदानाचे काम करीत आहेत. त्यांचे काम गौरवास्पद असल्याचे गौरवोद्गार माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन मा. नितीनकुमार वामनराव शेंडे यांनी काढले.

 

शिवनगर विद्या प्रसारक मंडळाचे कॉलेज ऑफ कॉमर्स सायन्स अँड कॉम्प्युटर एज्युकेशन, माळेगाव बुद्रुक येथील वाणिज्य विभागाचे प्रा. डॉ. मंगेश सुभाष फुटाणे यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळाच्या पुणे ग्रामीण विभाग समन्वयक पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार मा. नितीन शेंडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, कोणत्याही क्षेत्रात प्रामाणिकपणे काम करा, यश तुमच्या पाठीमागे धावेल. डॉ. फुटाणे यांनी विद्यार्थी विकास मंडळाच्या विविध योजना, शिबिरे, कार्यशाळा, व्यक्तिमत्व विकास, निर्भय कन्या अभियान, कमवा व शिका आदी उपक्रम प्रभावीपणे राबवलेले असल्याने त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे. यावेळी शेंडे यांनी आपल्या विनोदी शैलीतून विद्यार्थ्यांना किस्से सांगितले, त्यांना विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

 

जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य मा. प्रमोद मानसिंगराव जाधव म्हणाले, शिक्षकांनी ज्ञानार्जनाबरोबरच विद्यार्थ्यांना इतर कलागुणांचेही ज्ञान द्यावे. तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थी विकास मंडळ व ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या शारदाबाई पवार महिला महाविद्यालय आणि अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय यांच्या वतीने आयोजित विभागीय जल्लोष युवा महोत्सवात शिवनगर विद्या प्रसारक मंडळाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा व आपली चमक दाखवावी, अशी आशा यावेळी प्रमोद जाधव यांनी व्यक्त केली.

 

यावेळी शिवनगर विद्या प्रसारक मंडळाचे सचिव डॉ. धनंजय ठोंबरे व प्राचार्य डॉ. अजित चांदगुडे यांनी आपल्या मनोगतातून विद्यालयाच्या वतीने राबविले जाणारे उपक्रम विशद करून डॉ. फुटाणे यांच्या निवडीबद्दल समाधान व्यक्त केले.

 

विद्यार्थिनी आरती सुतार, वैष्णवी सुतार, पूनम रणपिसे यांनी डॉ. फुटाणे सरांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.

 

कार्यक्रमास प्रा. आबा थोरात, *प्रा. रोहन तावरे, प्रा. सचिन भिलारे, प्रा. कुणाल धांगडे,* प्रा. डॉ. दिपाली जाधव, *प्रा. पूनम केवटे, प्रा. बेबीताई झारगड, प्रा. अनुराधा चव्हाण* यांसह विद्यार्थी-शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन ऋतुजा सायकर व जुई काटकर यांनी तर आभार ओंकार जगताप यांनी मानले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या