Wednesday, November 4, 2026
spot_img
spot_img

पुण्यात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वाहनांबाबतचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे

बातमी पुण्यामधून एक नजर महाराष्ट्र न्यूज            पुणे : या व्हिडिओमध्ये त्यांच्या दोन फॉर्च्युनर गाड्यांवर हाय-सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट अर्थात HSRP नंबर प्लेट नसल्याचा दावा करण्यात आला आहे. पुण्यातील समाजसेवक संतोष पंडित यांनी पडळकरांना याबाबत थेट जाब विचारल्याचेही व्हिडिओमध्ये दिसत आहे.

 

व्हायरल व्हिडिओनुसार, पडळकर यांच्या दोन महागड्या फॉर्च्युनर वाहनांवर अद्याप HSRP नंबर प्लेट बसवण्यात आलेली नाही. यावर संतोष पंडित यांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर पडळकर यांनी मराठी अक्षरात नंबर प्लेट असल्याचे उत्तर दिल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच व्हिडिओ बंद करण्यास सांगितल्याचेही या व्हिडिओत दिसत असल्याचे म्हटले जात आहे.

 

सीटबेल्टवरूनही प्रश्न

 

या व्हिडिओमध्ये आणखी एक मुद्दा चर्चेत आला आहे. गाडीच्या पुढील सीटवर बसलेले गोपीचंद पडळकर आणि चालक यांनी सीटबेल्ट लावला नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. सीटबेल्टचा वापर सर्वांसाठी अनिवार्य असताना लोकप्रतिनिधींनीही वाहतूक नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे.

 

दरम्यान, HSRP नंबर प्लेट आणि सीटबेल्टच्या नियमांबाबत सामान्य नागरिकांवर कारवाई केली जाते. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावरही समान पद्धतीने कारवाई होणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

 

या प्रकरणामुळे सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत असून, व्हायरल व्हिडिओतील दाव्यांबाबत संबंधित प्रशासन किंवा गोपीचंद पडळकर यांची अधिकृत भूमिका समोर येणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे या प्रकरणात पुढे काय कारवाई होते आणि पडळकर यांच्याकडून याबाबत स्पष्टीकरण दिले जाते का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या