Friday, August 21, 2026
spot_img
spot_img

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वैद्यकीय महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त विविध उपक्रम संपन्न

एक नजर महाराष्ट्र न्युज                                संपादक  भिमसेन जाधव                                    बारामती,दि.७ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच महिला रुग्णालय, बारामती यांच्या सहकार्याने जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त विविध जनजागृतीपर कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले.

 

यावेळी महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. अंजली पाटील, स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ. सचिन दगडे, पॅथॉलॉजी विभागाच्या विभागप्रमुख डॉ. लीना नखाते, बालरोगचिकित्साशास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ. समीर पवार, महिला रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. भोई, मॅट्रन सीमा माने तसेच बालरोग विभागाच्या सिस्टर इंचार्ज रजिता यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

माता व नवजात शिशूच्या आरोग्यासाठी स्तनपानाचे अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित करणे, जन्मानंतरच्या पहिल्या तासात स्तनपान सुरू करण्याचे महत्त्व पटवून देणे तसेच जन्मापासून पहिल्या सहा महिन्यांपर्यंत केवळ आईचे दूध देण्याबाबत जनजागृती करण्यात आली. यावेळी गर्भवती माता, प्रसूत माता आणि त्यांच्या कुटुंबीयांना स्तनपानाचे आरोग्यदायी फायदे, योग्य स्तनपान पद्धती, आईच्या दुधामुळे नवजात बालकाची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास होणारी मदत, बालकांच्या शारीरिक व बौद्धिक विकासातील स्तनपानाचे महत्त्व तसेच सहा महिन्यांनंतर पूरक आहारासह दोन वर्षे किंवा त्यापुढेही स्तनपान सुरू ठेवण्याबाबत तज्ज्ञ डॉक्टरांनी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या