Friday, August 21, 2026
spot_img
spot_img

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना 2026जिल्ह्यात 43 हजाराहून अधिक शेतकऱ्यांनी केले आधार प्रमाणीकरण-जिल्हा उपनिबंधक प्रकाश जगताप

पुणे, दि. 29: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत काल अखेर 43 हजार 371 इतक्या शेतकऱ्यांनी आपले सरकार सेवा केंद्रावर जावून आपले आधार प्रमाणीकरण घेतले आहे, आधार प्रमाणीकरण करुन घेतल्यानंतरच त्यांच्या कर्जखात्यात रक्कम जमा होणार आहेत तसेच नवीन पीक कर्ज घेण्यासही शेतकरी पात्र होणार आहेत, त्यामुळे आपले आधार प्रमाणीकरण करुन करुन घ्यावे, असे पुणे ग्रामीण सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक प्रकाश जगताप यांनी केले आहे.

 

कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे 1 लाख 8 हजार 30 आणि विविध वाणिज्य बँकेचे 17 हजार 756 अशी एकूण 1 लाख 22 हजार 786 इतक्या खात्याची माहिती पोर्टलवर अपलोड करण्यात आली होती त्यापैकी पहिल्या यादीमध्ये 64 हजार 664 शेतकरी कर्जमुक्ती योजनेकरिता पात्र झाले आहेत, अशी माहिती श्री. जगताप यांनी दिली आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या