Sunday, August 23, 2026
spot_img
spot_img

माळेगाव सोसायटीचे कार्य गौरवास्पद संत सोपान महाराज पालखी सोहळा.

ॲड.त्रिगुणकाका गोसावी

एक नजर महाराष्ट्र न्युज  प्रमोद जाधव माळेगाव (प्रतिनिधी), माळेगाव बुद्रुक विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे कार्य गौरवास्पद असल्याचे सुतोवाच्य श्री संत सोपान काका पालखी सोहळ्याचे प्रमुख त्रिकोण काका गोसावी यांनी केले .श्री संत सोपान काका पालखीचे आगमन माळेगाव बुद्रुक येथे झाले असता त्यांनी माळेगाव सोसायटीला आवर्जून सदिच्छा भेट दिली. 1951 साली स्थापन झालेल्या या सोसायटीचा गुणगौरव करताना यावर्षी सोसायटीचे 75 वर्षात पदार्पण होत असल्याने संस्थेची उत्तरोत्तर प्रगती होवो अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या. यावेळी संस्थेच्या वतीने चेअरमन सीमा बाळासाहेब सस्ते व व्हाईस चेअरमन शुभांगी वैभव तावरे यांनी त्रिगुण काका गोसावी यांचा सन्मान केला. यावेळी संस्थेचे संचालक प्रमोद मानसिंगराव जाधव ,शशिकांत तावरे, वसंतराव तावरे, दिग्विजय जाधवराव, सचिन पैठणकर, निशिगंध तावरे, अभिजीत तावरे ,विनोद सस्ते, रमेश नलवडे ,संपतराव लोणकर, दिलीप बुरुंगले, विजय भोसले, प्रताप तावरे, गौरव निंबाळकर, वीरेंद्र भुंजे ,शशिकांत देवकाते, यांसह सभासद वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमरसिंह जाधवराव यांनी तर आभार संस्थेचे सचिव विकास तावरे यांनी मांडले.                                                     माळेगाव बुद्रुक विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वतीने श्री संत सोपान काका महाराज पालखी प्रमुख त्रिगुण गोसावी काका महाराज यांचे स्वागत करण्यात आले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या