Saturday, August 22, 2026
spot_img
spot_img

पालखी सोहळा महात्मा गांधी बालक मंदिर बारामती ,पूर्व प्राथमिक विभागांमध्ये

एक नजर महाराष्ट्र न्युज                           बारामती :  मंगळवार दिनांक २१-७-२०२६ रोजी पालखी सोहळा आयोजित करण्यात आला . यावेळेस संत ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रतिमेचे पूजन संस्थाअधिक्षक श्री .व्ही.के. सोनवणे सर व पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ.नयन देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळेस विद्यार्थ्यांनी विठ्ठल ,रुक्मिणी व विविध संतांच्या वेशभूषा केली होती. भिगवण चौकातील स्तंभाला वळसा घालून हरीनामाच्या गजरात दिंडी शाळेत परत आली. मुलांनी हरिपाठ म्हणला तसेच मुलींनी फुगडी घालून दिंडीचा आनंद घेतला. यावेळेस बालक ,पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. अशाप्रकारे सोहळा मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात पडला.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या