Friday, August 21, 2026
spot_img
spot_img

ह.भ.प. उमेश महाराज मोरे यांच्या हस्ते लोणी देवकर एमआयडीसी येथे वृक्षारोपण

वृक्षारोपण ही भावी पिढीप्रती सामाजिक जबाबदारी-ह.भ.प. उमेश महाराज मोरे

 

 

पुणे, दि.१६: श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे विश्वस्त ह.भ.प.उमेश महाराज मोरे यांच्या हस्ते इंदापूर तालुक्यातील

लोणी देवकर येथील एमआयडीसी येथील सुदर्शन जीन्स प्रा. लि. येथे वृक्षारोपण करण्यात आले.

 

यावेळी एमआयडीसी बारामतीचे प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील, उप प्रादेशिक अधिकारी सुरेंद्र निकम, नायब तहसीलदार अविनाश डोईफोडे, सुदर्शन जीन्स प्रा. लि.चे प्रमुख गौतम बन्सल आदी उपस्थित होते.

 

ह.भ.प. उमेश महाराज मोरे म्हणाले, “वृक्षारोपण ही केवळ पर्यावरण जपण्याची मोहीम नसून ती भावी पिढीप्रती आपली सामाजिक जबाबदारी आहे. संत परंपरेने निसर्गपूजेचा आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला आहे. प्रत्येकाने किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करावा. हरित आणि स्वच्छ पर्यावरण हीच समाजाला खरी सेवा असून, वृक्षसंवर्धनातून समृद्ध व निरोगी भवितव्य घडेल, असे ह.भ.प. उमेश महाराज मोरे म्हणाले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या