Sunday, August 23, 2026
spot_img
spot_img

मुंढे साहेब असते, तर कॅन्सर झाला नसता…

एक नजर महाराष्ट्र न्यूज                                पुणे  :”    माणसाचा देह आजाराने थकलेला असू शकतो, पण मनातील श्रद्धा आणि एखाद्या अधिकाऱ्याबद्दलचा विश्वास किती प्रबळ असू शकतो, याचे हे जिवंत उदाहरण!” आषाढी वारीच्या मार्गावर दिसलेला हा दृश्य अनेकांना भावूक करून गेले आहे.

 

या फोटोमध्ये एक वारकरी गळ्यात तुकाराम मुंढे साहेबांचा फोटो बांधून चालताना दिसत आहे. कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराशी झुंज देणाऱ्या या वारकऱ्याच्या मनात एकच भावना आहे”आधी मुंढे असते, तर कॅन्सर झाला नसता…” हे वाक्य प्रशासनातील एका अधिकाऱ्याबद्दलचा सर्वसामान्यांच्या मनात असलेला प्रचंड विश्वास आणि आदर व्यक्त करते.

 

जेव्हा एखादा अधिकारी आपल्या कामातून आणि पारदर्शकतेतून लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवतो, तेव्हा तो केवळ एक सरकारी नोकर राहत नाही, तर तो लोकांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू बनतो. तुकाराम मुंढे यांच्याबद्दल या आजारी वारकऱ्याने व्यक्त केलेले हे मत त्यांच्या कामाची पोचपावतीच आहे.

 

कॅन्सरशी लढणाऱ्या या वारकऱ्याची ही निष्ठा खरोखरच अंगावर काटा आणणारी आहे. पंढरीच्या पांडुरंगाकडे आणि प्रशासनातील अशा कार्यक्षम अधिकाऱ्यांकडे लोकांच्या असलेल्या अपेक्षा किती मोठ्या आहेत, हेच यातून दिसून येते.

 

प्रशासकीय अधिकारी जेव्हा कामातून लोकांची मने जिंकतात, तेव्हा असे प्रसंग पाहायला मिळतात.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या