एक नजर महाराष्ट्र न्युज बारामती : माहितीचा अधिकार कायदा जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यरत असलेल्या “माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ” या राज्यस्तरीय संघटनेच्या पुणे जिल्हा कार्याध्यक्षपदी बारामती येथील सामाजिक कार्यकर्ते मंगलदास तुकाराम निकाळजे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुभाष बसवेकर यांच्या स्वाक्षरीने नियुक्तीपत्र देण्यात आले असून, ही नियुक्ती १९ मे २०२६ पासून पुढील आदेश येईपर्यंत लागू राहणार आहे. तसेच महासंघाच्या वतीने त्यांना अधिकृत ओळखपत्रही प्रदान करण्यात आले आहे.
मंगलदास निकाळजे हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक प्रश्न, जनहिताचे विषय आणि माहिती अधिकार कायद्याच्या माध्यमातून सामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी सक्रियपणे कार्य करत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेत महासंघाने त्यांच्यावर पुणे जिल्ह्याची महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.
नियुक्तीनंतर बोलताना मंगलदास निकाळजे यांनी सांगितले की, “माहितीचा अधिकार हा जनतेचा मूलभूत अधिकार असून, समाजातील प्रत्येक नागरिकापर्यंत हा कायदा पोहोचवण्यासाठी आणि पारदर्शक प्रशासनासाठी मी प्रामाणिकपणे काम करणार आहे.”
या नियुक्तीबद्दल विविध सामाजिक, राजकीय आणि आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.






