Thursday, June 11, 2026
spot_img
spot_img

पुण्यात दहशतवादी कृत्याचा प्रयत्न? हडपसरमध्ये सापडला जिवंत बॉम्ब, पोलिसांकडून परिसराची नाकेबंदी

आजची मोठी बातमी पुण्यातून                              पुणे :  पुण्यातील गजबजलेल्या हडपसर परिसरात बुधवारी एकच खळबळ उडाली. येथील कामधेनू इस्टेटमधील एका प्रसिद्ध हॉस्पिटलसमोर बॉम्ब सापडल्याने संपूर्ण प्रशासन हादरून गेले आहे.                                                               पुण्यातील गजबजलेल्या हडपसर परिसरात बुधवारी एकच खळबळ उडाली. येथील कामधेनू इस्टेटमधील एका प्रसिद्ध हॉस्पिटलसमोर बॉम्ब सापडल्याने संपूर्ण प्रशासन हादरून गेले आहे. विशेष म्हणजे राज्यभरात दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) छापेमारी सुरू असतानाच पुण्यात ही घटना घडल्याने याला गंभीर वळण मिळाले आहे. सात तासांचा टाइमर लावलेली ही वस्तू जिवंत बॉम्ब आहे, अशी माहिती या आहे. बॉम्ब आढळल्याची माहिती समजताच पोलिसांनी परिसराची नाकेबंदी केली आहे. दरम्यान रात्री उशीरा हा बॉम्ब निकामी करण्यात पोलिसांना यश आलं. त्यामुळे मोठी हानी टळल्याचं मानलं जात आहे.

 

नेमकं काय घडलं?

हडपसर येथील कामधेनू इस्टेटमध्ये असलेल्या एका मोठ्या रुग्णालयासमोर ही संशयास्पद वस्तू आढळून आली. ही वस्तू बॉम्ब असल्याचा दाट संशय आल्याने तातडीने बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाला (BDDS) पाचारण करण्यात आले.                                                               या वस्तूमध्ये स्फोटक आणि टायमर लावल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून, सात तासांचा वेळ सेट करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून अग्निशमन दल आणि पोलिसांनी या वस्तूला सुरक्षितपणे एका मोकळ्या जागेत हलवले असून तिथे तपासणी सुरू आहे.                                   पुण्यातील शिरूर, चाकण आणि वारजे परिसरात एटीएसने छापे टाकून काही संशयितांना ताब्यात घेतले आहे. मुंबई, अकोला, नांदेड, नाशिक आणि जळगाव या शहरांमध्येही एटीएसने धाडी टाकल्या असून 57 जणांची चौकशी सुरू आहे.

 

शहजाद भट्टी आणि डिजिटल टेररिझमचा धोका

शहजाद भट्टी हा पाकिस्तानमधील लाहोर येथील अंडरवर्ल्डशी संबंधित गुन्हेगार असून तो दुबईतून आपल्या कारवाया चालवतो. भट्टीवर शस्त्रास्त्रांची तस्करी आणि ग्रेनेड हल्ल्यांचा संशय आहे. 2026 च्या सुरुवातीपासूनच तो भारतीय सुरक्षा यंत्रणांच्या निशाण्यावर आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतीय तरुणांना भडकवणे आणि देशात हिंसाचार घडवून आणणे, असा “डिजिटल टेररिझम” तो चालवत असल्याचा आरोप आहे. आयएसआयशी संबंधित असलेला भट्टी भारतातील विविध गुन्हेगारी नेटवर्कसाठी मध्यस्थ म्हणून काम करत असल्याने ही कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.                              पुण्यात हाय अलर्ट आणि पुढील तपास

हडपसरमध्ये सापडलेला बॉम्ब वस्तू आणि एटीएसची कारवाई यांचा एकमेकांशी संबंध आहे का, याचा तपास आता पोलीस करत आहेत. सध्या हडपसर परिसर आणि रुग्णालयाबाहेर कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. या प्रकरणातील संशयितांचे सोशल मीडिया व्यवहार आणि बँक खात्यांचीही पडताळणी केली जात असून, येत्या काही तासांत मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.                                             नजर महाराष्ट्र न्यूज                                 बातमी तुमची नजर आमची

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या