आजची मोठी बातमी एक नजर महाराष्ट्र न्युज वर विजय मुख्यमंत्री होणार हे स्पष्ट होताच चेन्नईत टीव्हीकेच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी आणि ढोल-ताशांच्या गजरात विजयोत्सव साजरा केला. मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा! ‘या’ पक्षांनी दिला पाठिंबा, बहुमताचा आकडा पार
विजय यांचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा! ‘या’ पक्षांनी दिला पाठिंबा, बहुमताचा आकडा पारविजय मुख्यमंत्री होणार हे स्पष्ट होताच चेन्नईत टीव्हीकेच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी आणि ढोल-ताशांच्या गजरात विजयोत्सव साजरा केला.
विजय यांचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा! ‘या’ पक्षांनी दिला पाठिंबा, बहुमताचा आकडा पार
रोज पहा. एक नजर महाराष्ट्र न्युज
तामिळनाडूच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. तामिळनाडूच्या राजकारणाने शुक्रवारी एक ऐतिहासिक वळण घेतले आहे. अभिनेता ते राजकारणी असा प्रवास करणाऱ्या विजय यांच्या ‘तमिळगा वेत्री कळघम’ (TVK) पक्षाला डाव्या पक्षांसह (CPI, CPI-M) आणि विदुथलाई चिरुथाईगल कात्ची (VCK) या पक्षांनी पाठिंबा जाहीर केला आहे. या पाठिंब्यामुळे विजय यांचा मुख्यमंत्रिपदाचा मार्ग मोकळा झाला असून, ते आज सायंकाळी 4:30 वाजता राज्यपालांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा करणार आहेत. या पक्षांनी पाठिंबा दिल्यामुळे विजय यांनी बहुमताचा आकडा पार केला आहे.
निवडणूक निकालानंतर बहुमतासाठी लागणारा आकडा गाठताना ओढाताण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, सीपीआय, सीपीआय(एम) आणि व्हीसीके या प्रमुख पक्षांनी जनमताचा आदर करत विजय यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. टीव्हीकेचे नेते कामराज यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, पक्षाला पूर्ण बहुमत मिळाले असून मित्रपक्षांच्या साथीने एक स्थिर सरकार तामिळनाडूमध्ये स्थापन होईल. टीव्हीके आणि काँग्रेसचे मिळून 113 आमदार होते. त्यात आता डाव्या पक्षाचे 4 आणि व्हीसीके पक्षाचे 2 आमदारांनी पाठिंबा देवू केला आहे. त्यामुले हा आकडा आता 119 झाला आहे. जो की बहुमता पेक्षा एकने जास्त आहे.






