Tuesday, March 24, 2026
spot_img
spot_img

तंत्र-मंत्र अन् जादुटोणाबाबत अशोक खरात न्यायालयात काय म्हणाला? 7 वाक्यात संपवला विषय

आजची बातमी नाशिक मधून                               नाशिक:   महिलांवर लैंगिक अत्याचार आणि तंत्र-मंत्राचा वापर करीत अमानुष अत्याचार करणाऱ्या अशोक खरात याला न्यायालयाने 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.          कोठडी सुनावली आहे.                                               30 वर्षांच्या महिलेचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपावरून सुरू झालेला हा तपास आता थेट मानवी बळी आणि वन्यजीव शिकारीपर्यंत पोहोचल्याने संपूर्ण राज्य हादरले आहे. नाशिक न्यायालयात आज न्यायाधीशांनी अशोक खरात याला तुम्हाला काही बोलायचं आहे का? अशी विचारणा केली असता अशोक खरातने स्वतः बाजू मांडली.

 

नक्की वाचा – Ashok Kharat : लिंगपिसाट खरातने पीडितांवर अत्याचार कसे केले? पहिल्यांदाच भयंकर तपशील आला समोर

 

अशोक खरात न्यायालयात काय म्हणाला?

जादूटोणा याबाबत मला काहीही माहिती नाही

साप, वाघ, हरिण हे सगळं मी आत्ताच ऐकत आहे

या अगोदर पोलिसांनी मला याबाबत कोणताही प्रश्न विचारलेला नाही

मी पूजा करत असताना ईशान्येश्वर मंदिरात एकाच वेळी शंभरहून अधिक लोकं असायचे

ईशान्येश्वर मंदिरात शिवरात्र आणि श्रावणी सोमवार अशावेळी जात होतो

सात दिवसांच्या पोलीस कोठडीत जे प्रश्न विचारले त्याची उत्तर मी दिली आहे

साप, वाघ याबद्दल मला काहीच माहिती नाही.

अशोक खरातच्या संपत्तीचा सातबारा

नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत खरातच्या तब्बल ५२ मालमत्ता आहेत…

पाथर्डीत १५० कोटींची ३० एकर जमीन

सिन्नरच्या कहांडळवाडीत ५ कोटींची ४५ एकर जमीन

पाथर्डी, गौळाणेत ३० कोटींहून अधिक किमतीची जमीन

गौळाणेत मोक्याच्या जागी १५ भूखंड

सिन्नरमध्ये १ कोटीचे २ व्यापारी गाळे

मीरगावात १० कोटींहून जास्त किमतीचे फार्म हाऊस

अहिल्यानगरमध्ये ५ एकरांचा कोट्यवधींचा भूखंड

ओझर विमानतळाजवळ ५ कोटींची जमीन

जानोरी, दहावा मैल भागात मोक्याचे भूखंड

नाशिकमध्ये कॅनडा कॉर्नरवर सुमारे एक कोटीचं ऑफिस                                                            कर्मयोगीनगरमध्ये ५ कोटींचा बंगला

शिर्डीच्या पानमळ्यात ३० गुंठ्यांची कोट्यवधींची जागा

निघोजमध्ये ४ एकरांची कोट्यवधींची जागा

शिर्डीमध्ये ७० कोटींचे प्लॉट

मिरगावातल्या घरी लाखोंची कॅश

वेगवेगळ्या ठिकाणी ३० फ्लॅट

सिन्नरमध्ये महत्त्वाच्या जागांवर दुकानं

आणि ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टची दोन कोटींची वार्षिक उलाढाल

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या