Tuesday, March 31, 2026
spot_img
spot_img

नवऱ्याला बाहेर बसवून गर्भवती पत्नीला कॅबिनमध्ये बोलावलं अन्… अशोक खरातचं संतापजनक कृत्य

नासिक :अशोक खरात प्रकरणात गुन्ह्यांची संख्या वाढली आहे. आणखी 3 गुन्हे दाखल झाल्याने गुन्ह्यांची संख्या एकूण 6 वर गेली आहे. लैंगिक शोषण आणि फसवणुकीच्या तक्रारींमध्ये वाढ होत आहे.                                                    नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात ऊर्फ ‘कॅप्टन’च्या काळ्या कर्तृत्वाचा पाढा आता अधिकच भयावह होत चालला आहे. एसआयटी (SIT) तपासात खरातने केवळ महिलांचे लैंगिक शोषणच केले नाही, तर रिमोट कंट्रोल साप आणि वन्यजीवांच्या अवशेषांचा वापर करून एक मोठे ‘मायाजाल’ उभे केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाचे धागेदोरे आता मंत्रालयापर्यंत पोहोचले आहेत.

 

नव्या पीडितेचा भयानक जबाब

एका महिलेने खरातवर बलात्काराचा गुन्हा दाखल केल्यानंतर, आता दुसरी एक पीडिता समोर आली आहे. पीडित महिला गरोदर असताना, विधी करण्याच्या बहाण्याने अशोक खरातने तिला बोलावले. पीडित महिला तिच्या पतीसोबत तिथे पोहोचली होती. मात्र खरातने तिच्या पतीला बाहेर थांबवून तिला कॅबिनमध्ये बोलावले आणि तिच्यावर अत्याचार केला. कोणाला काही सांगितल्यास गंभीर परिणाम भोगण्याची धमकी त्याने पीडितेला दिली होती.                                पीडित महिलांसाठी हेल्पलाईन नंबर

अशोक खरात प्रकरणात गुन्ह्यांची संख्या वाढली आहे. आणखी 3 गुन्हे दाखल झाल्याने गुन्ह्यांची संख्या एकूण 6 वर गेली आहे. लैंगिक शोषण आणि फसवणुकीच्या तक्रारींमध्ये वाढ होत आहे. पोलिसांकडून पीडित महिलांसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी करण्यात आला आहे. पीडित महिलांनी 9503270224 / 7775816389 या हेल्पलाईन क्रमांकांवर संपर्क साधण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे. अधिकाअधिक महिलांनी पुढे येऊन तक्रार करण्याचे आवाहन देखील पोलिसांना केलं आहे.

 

कॅप्टन’ची मोडस ऑपरेंडी

तपास यंत्रणांनी खरातच्या फसवणुकीचे तंत्र उघड केले आहे. भक्तांना चमत्कार दाखवण्यासाठी तो रिमोटने चालणारा बनावट साप वापरायचा. तांत्रिक विधीचा प्रभाव पाडण्यासाठी त्याने कार्यालयात वाघाचे कातडे आणि इतर अघोरी वस्तू ठेवल्या होत्या. केवळ 100 रुपयांचे चिंचोके आणि बनावट खडे तो लोकांच्या आर्थिक क्षमतेनुसार 10 हजार ते 1 लाखांपर्यंत विकायचा.

150 परदेश वाऱ्या आणि 154 देशांचा दावा

अशोक खरातने आपल्या व्यवसायातून मिळालेल्या पैशातून आतापर्यंत सुमारे 150 परदेश वाऱ्या केल्या आहेत. नुकतेच त्याचे दक्षिण कोरियातील सहलीचे फोटो व्हायरल झाले असून, हे पैसे खंडणी आणि फसवणुकीतून आले आहेत का, याचा तपास एसआयटी करत आहे. खरातकडे तब्बल 52 मालमत्तांची कागदपत्रे असल्याचेही सूत्रांनी सांगितले.                                               रोज पहा एक नजर महाराष्ट्र न्यूज

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या